Thalapathy Vijay Movie Poster: 'शांत राहा आणि संघर्ष टाळा...' थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपट पोस्टर प्रदर्शित

Thalapathy Vijay Leo Poster Out: थलापती विजयचा आगामी चित्रपट 'लिओ'चे पोस्टर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Thalapathy Vijay Leo Movie Poster Out
Thalapathy Vijay Leo Movie Poster OutInstagram/ @actorvijay

Vijay's Leo Telugu Poster Released:

दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयच्या आगामी चित्रपटाचे तेलुगू पोस्टर प्रदर्शित झाले आहे. विजयचे चाहते त्याच्या या पोस्टरची खुप दिवसांपासून वाट पाहत होते. चित्रपटाची घोषणा आणि फर्स्ट लूक रिव्हील झाल्यापासून त्याचे चाहते 'लिओ'ची आतुरतेने होते.

थलापती विजयचा आगामी चित्रपट 'लिओ'चे पोस्टर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय विचारात हरवलेला दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने घातलेले टी-शर्ट खूप बोलके आहे. या टी -शर्ट असलेल्या चित्रात विजय काश्मीरमध्ये बर्फात डोंगरावर धावताना दिसत आहे. तसेच पोस्टर 'Keep Calm And Avoid Battle' असे लिहिलेले आहे.

Thalapathy Vijay Leo Movie Poster Out
Santosh Juvekar Post: संतोष जुवेकरचा अजूनही स्ट्रगलर साला? चाळीतील दुकानात करतोय हेअर कट

थलापती विजय आणि चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश कनागराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून थलापती विजय सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेता काश्मीरच्या खोऱ्यात काय करत आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तसेच या चित्रपटाच्या कथनकाविषयी उत्सुकता देखील प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. (Latest Entertainment News)

थलापती विजयचा 'लिओ' हा चित्रपट १९ ऑक्टोबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे. लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

या चित्रपटांध्ये थलापती विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, मायस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश कनागराजसह रत्ना कुमार आणि दिरज वैद्य यांनीही चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. (Celebrity)

युनाइटेड किंडममध्ये 'लिओ'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. चित्रपटाचे ऑडिओ लॉंच चेन्नईत होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com