
बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान त्यांच्या बिग बजेट चित्रपटांमुळे जबरदस्त चर्चेत आहे. अलिकडेच शाहरुखचा पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते त्याच्या आगामी 'जवान' या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. अलीकडेच, शाहरूखच्या आगामी चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्कुंठा शिगेला पोहोचली आहे.
शाहरुख खानच्या 'पठान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जामदार कलेक्शन केले आहे.या ब्लॉकबस्टर चित्रपटाने भारतातच नाही तर जगभरात यशस्वी कामगिरी केली आहे. आता चाहते शाहरूखच्या नव्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. शाहरूखचा आगामी चित्रपट 'जवान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या चित्रपटाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. शाहरुखच्या चित्रपटामध्ये साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन हा दिसणार नसल्याचे बोलले जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने शाहरुखच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. अल्लू अर्जुन सध्या व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. माहितीनुसार, अल्लू सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा द रुल' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. या आधीच जवानच्या निर्मात्यांनी अल्लू सोबत चित्रपटाविषयीशी बातचीत केल्याचे म्हटलं आहे. परंतु अल्लू त्यांच्या कामामुळे व्यग्र असल्याने वेळ देऊ शकला नाही. आणि यामुळे अल्लूने जवान या चित्रपटांसाठी नकार देत असल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, अल्लू अर्जुन त्याच्या आगामी चित्रपट पुष्पा द रूलवर वर लक्ष केंद्रित करत आहे.
शाहरूखच्या जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली करत आहेत. जवान या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त नयनतारा आणि विजय सेतुपाति हे दोन साऊथ सुपरस्टार मुख्य भूमिकेत आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान जवान या चित्रपटानंतर डंकी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी त्यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, संजू यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट हिरानी यांनी दिग्दर्शित केले आहेत.
Edited By- Manasvi Choudhary