//Amazon Publisher's Services //End of Amazon Publisher's Services Code

Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage: साऊथचा सुपरस्टार अडकला विवाहबंधनात, लग्नाचे फोटो आले समोर

Ashok Selvan And Keerthi Pandian Wedding: अशोक सेल्वनने बुधवारी सकाळी चित्रपट निर्माते अरुण पांडियन यांची मुलगी किर्ती पांडियनसोबत (Keerthi Pandian) सात फेरे घेतले.
Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage
Ashok Selvan And Keerthi Pandian MarriageSaam tv

South Superstar Marriage News:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा आणखी एक अभिनेता विवाह बंधनात अडकला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अशोक सेल्वनचे (Ashok Selvan) आज लग्न झाले. अशोक सेल्वनने बुधवारी सकाळी अभिनेता आणि चित्रपट निर्माते अरुण पांडियन यांची मुलगी अभिनेत्री कीर्ती पांडियनसोबत (Keerthi Pandian) सात फेरे घेतले. अशोक सेल्वेन आणि कीर्ती पांडियन गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर आज ते लग्नबंधनात (Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage) अडकले. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांना नवीन आयुष्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage
Kareena Kapoor Retirement: '...अन् त्या दिवसापासून मी काम करणं सोडून देईल', करीना कपूरची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांची काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा केला होता. जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. त्याचप्रमाणे आज पार पडलेल्या विवाहसोहळ्याला देखील मोजकेच पाहुणे उपस्थित होते. या लग्नात अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांनी बुधवारी तिरुनेलवेली येथील बालयांगोट्टईजवळ लग्न केले.

Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage
Sairaj Kendre New Song: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ रीलस्टार साईराज केंद्रेचं नशीब चमकलं, 'देवबाप्पा' गाण्यातून येणार भेटीला

अशोक आणि कीर्ती यांनी लग्नानंतर आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दिसत आहे की, अशोक आणि किर्तीने साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ऑफ व्हाईट कलरचा पारंपारिक पोषाख परिधान केला आहे. कीर्ती नववधूच्या रुपामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर अशोकची ड्रेसिंग स्टाईल सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage
Jawan 6th Day Collection: फक्त भारतातच नाही तर जगभरात 'जवान'ची हवा, ६०० कोटींपार कमाई करत मोडले सर्व रेकॉर्ड

अशोक सेल्वनने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्य लग्नाच्या फोटोंना तमिळ भाषेमध्ये कॅप्शन दिले आहे. त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. या फोटोंना अवघ्या ४ तासांमध्ये ३ लखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अशोक आणि कीर्ती यांनी चेन्नईमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.

अशोक सेल्वनने तमिळ चित्रपट 'सुथु कव्वुम'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी 'पिझ्झा 2', 'थेगिडी', 'सावले समाली', 'मनमथा लीलाई', 'होस्टल', 'सम पीपल' यांसारख्या अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशोकने अनी दिग्दर्शित 'निन्निला निन्निला' या चित्रपटातून तेलुगू चित्रपटांमध्ये पदार्पण केले. २०२१ मध्‍ये 'मराक्‍कर: अरबीकादलिंते सिम्‍हम' मधून त्याने मल्‍याळम चित्रपटसृष्‍टीत एन्ट्री केली.

Ashok Selvan And Keerthi Pandian Marriage
Kriti Verma News: GST अधिकारी पद सोडून अभिनेत्री झालेली कृती वर्मा ईडीच्या जाळ्यात, नेमकं काय आहे प्रकरण?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com