Bhau Kadam And Gaur Gopal Das: भाऊ कदम झाला व्यसनाधीन; गौर गोपाल दास यांच्याकडून घेतले व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन...

Gaur Gopal Das Motivational Video: ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये मोटिवेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी हजेरी लावली असून यावेळी भाऊ कदमने गौर गोपाल दास यांच्याकडून व्यसनमुक्तीचे धडे गिरवले.
Gaur Gopal Das in Chala Hawa Yeu Dya - Bhau Kadam
Gaur Gopal Das in Chala Hawa Yeu Dya - Bhau KadamInstagram

Gaur Gopal Das in Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’ हा टेलिव्हिजनवरील शो नेहमीच प्रेक्षकांचा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आले आहे. आतापर्यंत या शोमध्ये बरेच मराठी सेलिब्रिटी, सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर, सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सोबतच काही बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या शोमध्ये सहभागी झाले होते. पण आजच्या भागात या शो मध्ये एक वेगळीच व्यक्ती सहभागी होणार आहे. यावेळी शो मध्ये मोटिवेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी हजेरी लावली...

सोशल मीडियावर त्यांचा टीझर सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. यावेळी भाऊ कदमने गौर गोपाल दास यांच्याकडून व्यसनमुक्तीचे धडे गिरवले. त्यात त्यांनी भाऊला खूप चांगला संदेश दिला आहे. नेहमीच सेलिब्रेटी हजेरी लावणाऱ्या शोमध्ये चक्क आज गौर गोपाल दास हजेरी लावणार म्हणून सर्वांनाच कार्यक्रमाची उत्सुकता लागली. (Marathi Film)

Gaur Gopal Das in Chala Hawa Yeu Dya - Bhau Kadam
SS Rajamouli: पाकिस्तानच्या आडकाठीमुळे राजामौलींच्या स्वप्न अपुरं...

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, ‘चला हवा येऊ द्या’ मधील सर्वच कलाकारांनी थेट प्रेक्षकांमध्ये जात कार्यक्रमाचा आनंद लुटला. प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये सर्वांनीच गौर गोपाल दास यांना प्रश्न विचारले. पण सर्वाधिक चर्चेत राहिला तो भाऊ कदमचा प्रश्न. यावेळी भाऊने कार्यक्रमात गौर गोपाल दास यांना त्याला असलेल्या एका व्यसनावरून प्रश्न विचारला. ते व्यसन सोडण्यासाठी काय करू असा त्याने प्रश्न विचारला.

‘मला चहा पिण्याचे खूपच व्यसन आहे. तर ते कसे सोडू?’ यावर गौर गोपाल दास यांनी एक सुंदर उदाहरण देत त्याला उत्तर दिले. गौर गोपाल दास यांनी उदाहरण दिले, “मला एकदा एक असा माणूस भेटला, ज्याला दिवसाला ६४ सिगारेट प्यायला लागायच्या. त्याने मला हे व्यसन कसं सोडू असा सवाल केला.”

Gaur Gopal Das in Chala Hawa Yeu Dya - Bhau Kadam
Shreyas Talpade At Hutatma Chowk: तू आहेस म्हणून मी आहे… श्रेयस तळपदेने महाराष्ट्रदिनी व्यक्त केली भावना

यावर त्यांनी उत्तर दिलं, “नको सोडूस तू हे व्यसन, हे ऐकल्यावर तुम्ही सर्वच हैराण व्हाल, तो ज्या पद्धतीने सिगारेट प्यायचा ते पाहून मी त्याला ते बंद कर असं बोलणं अशक्य होतं. मी त्याला बोललो, तू या महिन्यात २ सिगारेट कमी पिण्याचा प्रयत्न कर. हा आकडा मग ६२ वर येईल. असं प्रत्येक महिन्यात करण्याचा प्रयत्न कर तू नक्कीच तुझं एक दिवस व्यसन सुटेल. एकदमच बंद कर असं सांगण्यात तेव्हा काहीच पॉइंट नव्हता.”

हा एपिसोड १ मे आणि २ मे ला झी मराठीवर रात्री ९:३० वा. प्रदर्शित होणार आहे. गौर गोपाल दास सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो तरूणांपर्यंत आयुष्यातील काही रोचक गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com