Squid Game Season 2 : नेटफ्लिक्सवर होणार स्क्विड गेम २ लवकरच प्रदर्शित

नेटफ्लिक्सने रविवारी कोरियन थ्रिलर सिरीज 'स्क्विड गेम' (Squid Game)च्या दुसऱ्या भागाची घोषणा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे केली आहे.
Squid Game Season 2 : नेटफ्लिक्सवर होणार स्क्विड गेम २ लवकरच प्रदर्शित
Squid Game 2 Saam Tv

मुंबई : नेटफ्लिक्सने रविवारी कोरियन थ्रिलर सिरीज 'स्क्विड गेम' (Squid Game)च्या दुसऱ्या भागाची घोषणा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे केली आहे. 'स्क्विड गेम'चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता ह्वांग डोंग-ह्युकयांनी ही यासंबंधी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेयर केली आहे. या सिरीजचा पहिला भाग गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इतकंच नाही तर या सिरीजला प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रसिद्धीही मिळाली होती. नेटफ्लिक्सने (Netflix) 'स्क्विड गेम २' ची घोषणा ट्विटरवरून केली आहे. ( Squid Game Season 2 Latest News In Marathi)

Squid Game 2
Siddhanth kapoor : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला अटक; ड्रग्ज घेतल्याचा आरोप

नेटफ्लिक्सने ट्विटरच्या माध्यमातून स्क्विड गेमचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते ह्वांग डोंग-ह्युकयांनी त्यांच्या चाहत्यांना लिहिलेला एक संदेश पोस्ट केला आहे:" त्यात लिहिले आहे की, "गेल्या वर्षी स्क्विड गेमच्या पहिल्या भागाला प्रदर्शित करण्यासाठी मला १२ वर्षे लागली." त्याचबरोबर नेटफलिक्सने त्याला जोडून एक १० सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये बाहुलीच्या डोळ्यामध्ये २ असे दिसते व त्यात "रेड लाईट...ग्रीन लाईट! स्क्विड गेम अधिकृतपणे सीझन २ सह परत आला आहे. असे लिहिले आहे.

'स्क्विड गेम २' मधील नवीन पात्रे

दिग्दर्शकाने संदेशात पुढे असे लिहिले आहे की, 'स्क्विड गेमला नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय मालिका होण्यासाठी १२ दिवस लागले. स्क्विड गेमचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जगभरातील चाहत्यांनी माझे खूप कौतुक केले. आमचा कार्यक्रम पाहिल्याबद्दल आणि त्याला भरभरून प्रेम केल्याबद्दल सर्व चाहत्यांचे धन्यवाद. आता हा, गि-हुन दुसरा भाग घेऊन परत आला आहे."

'स्क्विड गेम २ ' बद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढली...

या संदेशात दिग्दर्शकाने शेवटी लिहिले आहे. "भाग २ येत आहे. आजोबांसोबतचा सूटमधला माणूस परत येऊ शकतो. येउंग-हीच्या प्रियकर चेउल-सूशी देखील प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. "या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, "ओएमजी! यासाठी मी आणखी वाट नाही बघू शकत." दुसर्‍याने लिहिले, "मला नवल वाटणार नाही की तुम्ही कलाकारांची फी अजून वाढवली." तर एकाने लिहिले, "हे चांगलेच झाले."

Squid Game 2
राखी बॉयफ्रेंडसोबत पोहोचली पोलीस स्टेशनला, रितेशवर लावले गंभीर आरोप

जगातील सर्वात जास्त पाहिलेला 'स्क्विड गेम'

'स्क्विड गेमच्या' गोष्टी बद्दल बोलायचे झाले, तर त्याची कथा पैशांच्या कमाईत अडकलेल्या लोकांबद्दल आहे. जे लहान मुलांच्या खेळांच्या माध्यमातून पैसे जिंकण्याच्या संधीसाठी स्पर्धेत उतरतात. पण पराभूत झाल्यास मृत्यू हाच पर्याय असतो. हा कार्यक्रम, जगभरातील नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेली वेब सिरीज म्हणून ओलखला जातो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com