Ss Rajamouli Announces New Movie: चित्रपटसृष्टीच्या मराठमोळ्या जनकाची कथा येणार रुपेरी पडद्यावर येणार; एस.एस.राजामौली यांनी केली ‘मेड इन इंडिया’ची घोषणा

Ss Rajamouli Announced New Movie: ‘बाहुबली’ आणि ‘RRR’नंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
S.S.Rajamouli Announced New Movie
S.S.Rajamouli Announced New MovieSaam Tv

SS Rajamouli Announced New Movie

‘बाहुबली’ आणि ‘RRR’नंतर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आणखी एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. आत्तापर्यंत भारतीय सिनेसृष्टीत अनेक बायोपिक बनवले आहेत. पण आतापर्यंत कोणीही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित एकाही चित्रपटाची निर्मिती केलेली नाही. पण आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित चित्रपट पाहायला मिळणार आहे.

‘मेड इन इंडिया’ असं या चित्रपटाचं नाव असून हा एक बायोपिक आहे. या बायोपिकची निर्मिती राजामौली यांचा मुलगा आणि निर्माता एसएस कार्तिकेय आणि वरुण गुप्ता यांनी केली आहे. तर बायोपिकचे दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत.

S.S.Rajamouli Announced New Movie
Kangana Ranaut Post: 'ही नव्या युगाची सुरुवात... ' महिला आरक्षणावर कंगना रनौतने व्यक्त केला आनंद

एसएस राजामौली यांनी ‘मेड इन इंडिया’ची अनाउंसमेंट करताना एक व्हिडीओ शेअर केली आहे. टीझर शेअर करताना एस.एस.राजमौली यांनी लिहिले की, “जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकली, तेव्हा ही कथा ऐकून मी भावुक झालो. बायोपिकची निर्मिती करणं खूप कठीण काम आहे. पण भारतीय चित्रपटाच्या पितामहाची गोष्ट एका चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना दाखवणं हे आव्हानात्मक आहे. पण आमची टीम त्यासाठी तयार आहेत. ‘मेड इन इंडिया’ची घोषणा करताना अपार अभिमान वाटतोय.” अशा आशयाचे त्यांनी ट्वीट केलं आहे. (Bollywood Film)

S.S.Rajamouli Announced New Movie
Kshitij Patwardhan Appreciation Post: ‘चारचौघी’ नाटकाच्या प्रेमात पडली ‘ताली’ची टीम, क्षितीज पटवर्धनने कौतुक करत केलेली खास पोस्ट चर्चेत

दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते. त्यांनी १९१३ मध्ये देशातील पहिला फिचर फिल्म ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट बनवला. पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देण्यासाठी दादासाहेब फाळके यांना खूप पापड करावे लागले. महिलांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली तर ती त्यांच्यामुळेच.

दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टी सुरू केली तर खरी पण त्यांच्याकडे चित्रपट बनवण्याचे कोणतेही साधन नव्हते. पण त्यांनी धीर सोडला नाही. आता एस.एस.राजामौली यांची कथा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.एका मीडिया रिपोर्टनुसार, एस.एस.राजामौली चित्रपटामध्ये ‘भारतीय चित्रपटाचा जन्म आणि उदय’ ही कथा चित्रपटामध्ये सांगणार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com