SS Rajamouli: 'बाहुबली' दिग्दर्शक एसएस राजामौलींच्या जीवाला धोका, राम गोपाल वर्मांच्या दाव्याने खळबळ

एस. एस. राजामौली यांच्या यशानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांचे एक ट्विट समोर आले आहे.
SS Rajamouli and Ram Gopal Varma
SS Rajamouli and Ram Gopal VarmaSaam Tv

Ram Gopal Varma Tweet: साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर एसएस राजामौली हे सध्या त्यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय एसएस राजामौली यांना क्रिटिक्स चॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले.

बॉलिवूडपासून साऊथ इंडस्ट्रीपर्यंतचे निर्माते त्यांच्या यशाची चर्चा करत आहेत. एस. एस. राजामौली यांच्या यशानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांचे एक ट्विट समोर आले आहे. राम गोपाल वर्मा या ट्विटद्वारे एसएस राजामौली यांना धमकी देताना दिसत आहेत.

SS Rajamouli and Ram Gopal Varma
Athiya-KL Rahul Wedding: अथिया-केएल राहुलच्या लग्नाला मुहूर्त मिळाला, पण रिसेप्शनचं काय?

निर्माता राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एस. एस. राजामौली यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की- आणि सर एस.एस. राजामौली कृपया तुमची सुरक्षा वाढवा, कारण भारतात चित्रपट निर्मात्यांचा एक गट आहे ज्यांनी चिडचिड आणि मत्सरातून तुम्हाला मारण्यासाठी एक पथक तयार केले आहे. मी पण त्याचा एक भाग आहे. मी फक्त एक गुपित तुम्हाला सांगत आहे. कारण मी चार पेग लावून आहे.

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत मजेशीर पद्धतीने त्यांचे कौतुक केले. राम गोपाल वर्माच्या या ट्विटनंतर यूजर्स सतत कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटले आहे, सर, अजून चार पेग प्या आणि बनवणाऱ्यांची नावे सांगा. बहुतेक युजर्स कमेंट सेक्शनमध्ये त्याच्या या ट्विटवर हसताना दिसत आहेत.

एस. एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ राम गोपाल वर्माच नाही तर जगभरातील चित्रपटप्रेमी चित्रपटाबद्दल त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते.

'आरआरआर' चित्रपटाने जागतिक स्तरावर 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. एसएस राजामौली हे बऱ्याच काळापासून हिट चित्रपट देत आहेत. याआधी त्यांचा बाहुबली हा चित्रपटही लोकांना खूप आवडला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com