
Munawar Farooqi : स्टॅंडप कॉमेडियन मुनावर फारुकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या ४ दिवसांवर त्याच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र शो सुरू होण्याआधीच भाजपकडून विरोध दर्शवला जात आहे. मुनावर फारुकी त्याच्या शोमध्ये हिंदू देवतांचा अपमान करतो असा आरोप भाजपने केला आहे.
२७ नोव्हेंबर रोजी वांद्रे (Bandra) येथील आर. डी. नॅशनल महाविद्यालयात मुनावर फारुकीच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र भाजपकडून याला कडाडून विरोध होत आहे. भाजपच्या युवा मोर्चाने पोलीस आयुक्तांकडे शो बंद करण्याची मागणी केली आहे. या आधी देखील भाजपने हैदराबाद येथील त्याचा शो बंद पाडला होता. त्यावेळी भाजपचे आमदार टी. राजा सिंह फार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
हिंदू देवतांवर टिका
मुनावर फारुकीने इंदौरमध्ये एका शोमध्ये राम-सिता यांचा आपमान करत त्यांच्यावर खिल्ली उडवणारे विनोद केलेत असे भाजपचे म्हणणे आहे. याने अनेक हिंदू (Hindu) धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे ठिकठिकाणी त्याच्या विरोधात तक्रारही दाखल झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील शोवर देखील विरोध करण्यात आला होता. आता मुंबईंमध्येही त्याच्या शोला विरोध होत आहे.
मुनावर फारुकीने स्टॅंडप कॉमेडीमध्ये मोठे नाव कमवले आहे. साल २०२२ च्या लॉकप या शोचा तो विजेता आहे. त्याच्या आयुष्यात इंदौरमधून मोठ्या वादाला सुरूवात झाली. इंदौरमध्येच त्याने पहिल्यांदा हिंदू देवतांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचे भाजपने म्हटले होते. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला जेलची हवाही खावी लागली. २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.