
Aai Kuthe Kay Karte Today Episode: ‘आई कुठे काय करते’ मालिका दिवसेंदिवस उत्कंठावर्धक वळणार जात आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपुर्वी आशुतोषच्या बहीणीची एंट्री झालीय. त्यामुळे सध्या मालिकेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यातच अरूंधतीला परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे, आजच्या भागात अरूंधतीला परदेशात जाण्याची संधी मिळाल्यामुळे अनिरूद्ध सोडून सर्वच तिचे कौतुक करतात.
यासर्व गडबडीत आशुतोष वीणाला आठवण करुन देतो की अरुंधतीने जाण्यापूर्वी सर्वांच्या सह्या कॉन्ट्रॅक्टवर होणे आवश्यक आहे. या विषयी बोलत असताना अनिरुद्ध तिथे पोहोचतो आणि खोचकपणे आशुतोषचे अभिनंदन करतो.
आजच्या भागात अनिरूद्धच्या उपस्थितीत वीणा तिच्या आईवडिलांच्या कंपनीचा ताबा घेण्याच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करते. त्या कॉन्ट्रॅक्टवर वीणासोबत अरुंधती, वीणा आणि आशुतोषही सह्या करतात. हे सर्वच अनिरूद्धने फेरफार केलेल्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या करतात त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नाही. आशुतोष या कंपनीचा डायरेक्टर म्हणून काम पाहणार असतो, तर त्यात अनिरूद्ध बदल करत आशुतोष सल्लागार म्हणून पद देतो. त्यानंतर
आशुतोषच्या डोक्यात एक वेगळाच विचार येतो, आशुतोष वीणाच्या या कंपनीत काहीच बोलू शकणार नाही, शिवाय त्याने गुंतवणूक केलेले पैसे २ वर्षात त्याला व्याजासकट परत केले जातील. त्यानंंतर आशुतोषचा कंपनीशी संबंध राहणार नाही.
अनिरूद्धच्या डोक्यातील विचारांचे तारे इतक्यावरच थांबत नाही, त्याला पुढे विचार येतो, ही कंपनी आता माझी होणार, तु माझी बायको पळवलीस आता मी तुझी कंपनी पळवतो. सह्या झाल्यानंतर आशुतोषला वीणा सांगते, भविष्यात कधीही मदत लागली तर मी तुझ्याकडेच येणार आहे. (Entertainment News)
यावेळी नितीन अनिरुद्धने कॉन्ट्रॅक्टमध्ये घोळ केल्याची शंका व्यक्त करतो आणि आशुतोषला सांगतो की तो ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा वाचणार आहे. मालिकेत सध्या अरूंधतीच्या परदेशात जाण्याची लगबग सुरू असून सर्वांच्याच जीवाची घालमेल होत आहे. आता पुढच्या भागात काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.