
मुंबई: राज्यासह मुंबईत (Mumbai) कोरोना (Corona) रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र तरीही कोरोना निर्बंधांमुळे अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम होतो. पन्नास टक्के सिनेमागृह (Cinema Halls) आणि नाट्यगृह (Theaters) सुरु ठेवण्याची परवानगी आहे, त्यामुळे या क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आवाज उठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी राज्य सरकारला नाट्यगृहं-चित्रपटगृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याचं आवाहन केलंय. (Start 100 percent theaters and cinemas "- MNS appeals to the government)
हे देखील पहा -
अमेय खोपकर यांनी ट्विट करत सरकारला याबाबत आवाहन केलंय. ते म्हणाले, "आता बास्स… सहनशक्तीचा अंत झाला. मुंबईसह राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. मॉल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स सगळं काही पूर्ववत झालं आहे. मग आता नाट्यगृहं-चित्रपटगृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास सरकारला नेमकी काय अडचण आहे?" असं ट्विट करत त्यांनी सरकारला नाट्यगृहं-चित्रपटगृहं १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा इशारा दिला आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून आता मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या घटली आहे.
७ फेब्रुवारी, संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत मुबईची कोरोना रुग्णसंख्या:
२४ तासात बाधित रुग्ण-३५६
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९४९
बरे झालेले एकूण रुग्ण-१०२७०९३
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८%
एकूण सक्रिय रुग्ण-५१३९
दुप्पटीचा दर-७६० दिवस
कोविड वाढीचा दर (३१जानेवारी- ६ फेब्रुवारी)-०.०९%
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.