राज्यात 100% क्षमतेने थिएटर्स सुरु करा; अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

22 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु होणाऱ्या नियमावलीत बदल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पात्र लिहून केली आहे.
राज्यात 100% क्षमतेने थिएटर्स सुरु करा; अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यात 100% क्षमतेने थिएटर्स सुरु करा; अमोल कोल्हेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रSaam Tv

मुंबई : केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची पकड सैल होऊ लागल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून, हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 22 ऑक्टोबरपासून थिएटर सुरु होणाऱ्या नियमावलीत बदल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पात्र लिहून केली आहे.

राज्यातील थिएटर्स 100 टक्के क्षमतेने सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे Dr Amol Kolhe यांनी राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50 टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी राज्य सरकारने मंगळवारी दिली. मात्र राज्य सरकारने या निर्णयात विचार करून 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरू करावेत. कारण कलाकारांची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशी मागणी करणारे पत्र मुखमंत्री यांना केले आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.