
FTII Students Protest the Kerala story: 'द केरला स्टोरी' चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कॅलेक्शन देखील दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चित्रपटाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा करत आहेत. आता या चित्रपटावरून 'एफटीआय'मध्ये आंदोलन सुरू झाले आहे.
भारतीय चित्रपट आणि दूरचित्राणी संस्थेत (एफटीआयआय) शनिवारी सकाळी 'द केरला स्टोरी'चे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी संघटनेने विरोध दर्शवत चित्रपटाला विरोध केला. सकाळी ९ वाजता चित्रपट सुरू होताना दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. (Latest Entertainment News)
'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे एफटीआयमध्ये स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला चित्रपटाची स्टार कास्ट एफटीआयमध्ये उपस्थित राहणार होती. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त एफटीआयमध्ये तैनात होता.
'द केरला स्टोरी'च्या स्क्रीनिंगच्या विरोधात विद्यार्थ्यांचे मोठ आंदोलन केले. विद्यार्थी संघटनेचा 'द केरला स्टोरी' विरोध होता. तर एफटीआयमधील एक गट चित्रपटलाच्या स्क्रिनींगला पाठिंबा देत होता.
चित्रपटाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाचे म्हणणे आहे की, 'द केरला स्टोरी' हा चित्रपट Propogenda फिल्म आहे. त्यामुळे हा चित्रपट येथे (एफटीआय) दाखवू नये.'
मागील काही दिवसांपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कारणास्तव आंदोलन चालू होते. शनिवारी सकाळीच 'द केरला स्टोरी'मुळे झालेल्या आंदोलनाचा आणि आधीपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही.
एफटीआयआयमधील २०२० च्या तुकडीतील पाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित गुणांकन नसणे या कारणास्तव काढून टाकले होते.
या विरोधात एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा पाचवा आणि आंदोलनाचा चाळीसावा दिवस चालू होता. केरला स्टोरीच्या स्क्रीनिंगलाही संघटनांनी विरोध केला असून पोलीस बंदोबस्तात स्क्रीनिंग पार पडले. शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रातील अनेकांनी चित्रपटाला उपस्थिती दर्शवली होती.
विरोध आणि टीकांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. चित्रपटाने १७५ कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच चित्रपट २०० कोटींचा टप्पा पार करेल असे समीक्षकांचे मत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.