Subodh Bhave Movie: सुबोध भावे साकारणार 'संत तुकाराम'; चित्रपटातील पहिला लूक केला शेअर

Biopic Saint Tukaram: सुबोध लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये दिसणार आहे.
Subodh Bhave’s Sant Tukaram Movie First Look Out
Subodh Bhave’s Sant Tukaram Movie First Look OutInstagram @subodhbhave

Subodh Bhave’s Sant Tukaram First Look Out: अभिनेता सुबोध भावे त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने साकारलेल्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. बालगंधर्व, लोकमान्य, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा उत्तम कलाकृती सुबोधने साकारल्या आहेत. सुबोध लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये दिसणार आहे.

सुबोधने त्याच्या या बायोपिकविषयीची माहिती त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. सुबोध त्याच्या आगामी चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील थोर संतांची भूमिका साकारणार आहे.

Subodh Bhave’s Sant Tukaram Movie First Look Out
TV Actress: टीव्ही अभिनेत्री मानसिकदृष्ट्या खचली; सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

सुबोधचा आहे चित्रपट मराठीत नाहीतर हिंदी भाषेत असणार आहे. सुबोधने शेअर केलेल्या त्याच्या पहिल्या लूकवर कमेंट करत अनेक मराठी कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच त्याचे कौतुक देखील केले आहे.

सुबोधने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर कर म्हटले आहे की, "संत तुकाराम" आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे.

ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमचा ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे. ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखीलिया!

सुबोधचा आगामी चित्रपट 'संत तुकाराम' यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सुबोध भावे संत तुकारामांच्या दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पुरुषोत्तम स्टुडिओज आणि बी गौतम करत आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य ओम करत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक उत्तम कलाकृती घेऊन सुबोध भावे आपल्या आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com