
Nora Fatehi Jacqueline Fernandez: २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी एक खळबळजनक दावा करणारं पत्र लिहिलं आहे. सुकेशने हे पत्र नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या दोघींमध्ये असलेल्या वादावर लिहिलं आहे. नोरा फतेहीनं तिचा जबाब आर्थिक गुन्हे ब्युरो (EOW)समोर बदलला होता. मी जॅकलीनला सोडावे असं अनेकदा नोराला वाटत होतं. मी दिलेल्या नाकारानंतरही नोरा सुकेशला त्रास द्यायची असा खुद्द दावा सुकेशने केला आहे.
सुकेशने आपल्या पत्रात दावा केला आहे की, 'नोरा फतेहीला नेहमी जॅकलीनचा हेवा वाटत असे आणि माझे ब्रेनवॉश करत असे. मी जॅकलीनपासून वेगळे व्हावे आणि तिला डेट करता यावे म्हणून नोरा असं करत होती. नोरा सुकेशला दिवसातून किमान 10 वेळा कॉल करायची आणि जर त्याने कधी फोन उचलला नाही तर त्याला सतत कॉल करायची. निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना हे फक्त व्यावसायिक सहकारी होते आणि ते माझ्या प्रॉडक्शनमध्ये काम करणार होते.'
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुकेशने लिहिलेल्या पत्रात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिनवर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. सोबतच सुकेश म्हणतो,'नोराने ईडी व ईओडब्ल्यूपुढे दिलेल्या वेगवेगळ्या जबाबामुळे ती सर्व खोटं बोलते असं दिसून येत आहे.
नोराची माझ्याकडून कार घेण्याची इच्छा नाही अशी खोटी माहिती दिली, हे सर्वात मोठे खोटे आहे. नोरा मला भेटली तेव्हा तिच्याकडे लक्झरी कार नव्हती. पण आम्ही दोघांनी एक लग्झरी कार निवडली होती, तिचा स्क्रीन शॉट्सही ईडीकडे आहे.
त्यामुळे नोराने खोटे बोलू नये. खरं म्हणजे मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण ती स्टॉकमध्ये नव्हती. म्हणून मी त्याला एक एस सीरीजची BMW कार भेट दिली. ती तिने अनेक दिवस स्वतःकडे ठेवली. पुढे सुकेश म्हणतो, नोराने मला अनेकदा महागड्या बॅग्स व दागिन्यांची फोटो पाठवले होते.
त्या मी तिला भेटवस्तू म्हणून दिल्या असून अजूनही ती त्यांचा वापर करते. मी नोराला आतापर्यंत अनेक कोटींच्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे ती त्याचे बिल कधीही दाखवू शकत नाही. निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना हे फक्त व्यावसायिक सहकारी होते आणि ते माझ्या प्रॉडक्शनमध्ये काम करणार होते.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.