Sunny Deol Reaction On Bank Auction: 56 कोटींच्या कर्जावर अखेर सनी देओल मौन सोडले; म्हणाला 'मी काहीही बोललो तर...'

Sunny Deol On Bank Notice: सनी देओलने या प्रकरणावर मौन सोडले आहे.
Sunny Deol Reaction On Bank Notice
Sunny Deol Reaction On Bank NoticeInstagram @iamsunnydeols_fan

Sunny Deol Reaction On Bank Notice:

'गदर २' चित्रपटाच्या यशसह अभिनेता सनी देओल आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. सनी देओल ५६ कोटींचे कर्ज आहे. कर्ज न फेडल्याने बँकेने सनी देओलला नोटीस पाठवली आहे. तसेच कर्जासाठी गहाण ठेवलेल्या घराचा लिलाव बँक करणार आहे.

बँकेने काही तांत्रिक कारणांमुळे ही स्थगिती थांबवली आहे. दरम्यान सनी देओलच्या या जुहू येथील बंगला चर्चेत आला आहे. यावरून राजकीय नेते देखील प्रतिक्रिया देत आहेत. अखेर सनी देओलने याविषयावरील मौन सोडले आहे.

Sunny Deol Reaction On Bank Notice
Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे 'यारियां 2'मधील गाणे घालणार धुमाकूळ; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

सनी देओल 'गदर 2'मुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, तो त्याच्या बंगल्याच्या लिलावामुळेही चर्चेत आहे. त्याचा चित्रपट आतापर्यंत ४०० कोटींच्या कलेक्शनच्या अगदी जवळ आहे. दरम्यान, 56 कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने बँक ऑफ बडोदाने स्टारला नोटीस बजावली होती.

आता खुद्द सनी देओलने या प्रकरणावर मौन सोडले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बंगल्याच्या लिलावाबाबत बोलताना सनी देओल म्हणाला, 'मला यावर भाष्य करायचे नाही, ही वैयक्तिक बाब आहे, मी काहीही बोलेन, लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतील.'

21 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशित केलेली नोटीस मागे घेण्याचे कारण स्पष्ट करताना बँकेने सांगितले की, सुरुवातीला एकूण किती रक्कम काढायची हे स्पष्ट नव्हते. दुसरे, त्यात दोन प्रमुख "तांत्रिक" कारणे देखील सांगितली ज्यानंतर बँकेने अभिनेता सनी देओलच्या मुंबईतील मालमत्तेच्या लिलावाची नोटीस मागे घेतली.

काय आहे सनी देओलचे लोन प्रकरण?

बँक ऑफ बडोदाने सनी देओलचा व्हिला लिलाव करण्याची जाहिरात काढली होती. सनी देओलने बँकेकडून खूप कर्ज घेतले होते. हे कर्ज घेण्यासाठी सनी देओलने त्याचा मुंबईतील 'सनी व्हिला' गहाण ठेवला होता. आता सनी देओलला ५६ करोड रुपयांची परतफेड करायची होती. ज्यापैकी त्याने अजूनपर्यंत कोणतीही रक्कम फेडलेली नाही.

हे कर्ज आणि त्यावरील व्याज फेडण्यासाठी बँकेने प्रॉपर्टीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात असे म्हटले आहे की, 'सनी व्हिला' २५ सप्टेंबरला लिलावात काढण्यात येणार आहे. या प्रॉपर्टीची रिजर्व प्राईज ५१.४३ करोड रुपये ठेवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com