
मुंबई : लवकरच प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो 'बिग बॉस १६'(Big Boss 16) टीव्हीवर प्रसारित होणार आहे. 'बिग बॉस १६' या शोमधील सर्व स्पर्धकांची नावे एकामागून एक समोर येत आहेत. अलीकडेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार आमिर खानचा भाऊ फैसल खान देखील सलमान खानच्या 'बिग बॉस १६' शोमध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. फैझल खान(Faisal Khan) या वादग्रस्त शोमध्ये भाग घेऊ शकतो असे वृत्त समोर येत आहे.
फैसलला 'बिग बॉस १६'मध्ये पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक होते. अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फैसल खान या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, जेव्हा फैसलला याबाबत विचारण्यात आले तेव्हा फैजलने सांगितले की, त्याने ही ऑफर नाकारली आहे. तथापि, फैसलने देखील पुष्टी केली की त्याला 'बिग बॉस १६' च्या निर्मात्यांनी संपर्क साधला होता.
फैजल खानला सध्या अनेक टीव्ही शोजच्या ऑफर्स येत आहेत. मात्र, तो कोणत्या शोमध्ये दिसणार हे त्याने अद्याप सांगितलेले नाही. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला, 'मी बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. मला इतर टीव्ही शोच्या ऑफर्सही आल्या आहेत. लोक मला त्यांच्या प्रोजेकट्समध्ये घेऊ इच्छितात हे जाणून खूप आनंद झाला.
फैसलने 'बिग बॉस १६' मध्ये येण्यास नकार दिला असला तरी, सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे चाहते त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले की 'सुवर्ण संधी गमावू नका, बिग बॉसमध्ये जा'. दुसर्या यूजरने लिहिले, 'सर तुम्ही एक कमाल व्यक्ती आहात, तुम्ही शोमध्ये जावे'. त्याचबरोबर सलमान खानचा 'बिग बॉस १६' हा शो १ ऑक्टोबरपासून प्रसारित होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.