Supreme Court on the Kerala Story: 'द केरळ स्टोरी'वरील बंदी उठवली, सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला धक्का

'द केरळ स्टोरी'वरून सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला धक्का, पश्चिम बंगालमधील बंदी उठवली
The Kerala Story
The Kerala StorySaam Tv

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जीं सरकारला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. आता हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी घातली होती, जी आता सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. आता लवकरच हा चित्रपट पश्चिम बंगालच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

The Kerala Story
Govinda's Wife Sunita Ahuja Get Trolled: महाकाल मंदिरात जाताना गोविंदाच्या पत्नीकडून मोठी चूक, ट्रोलर्सच्या निशाण्यावर सुनिता

या चित्रपटावर बंदी घालण्याच्या पश्चिम बंगालच्या निर्णयाला आम्ही स्थगिती देत आहोत, असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणाले आहे. असं म्हणत सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालमधील 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरील बंदी उठवली. (Latest Entertainment News)

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, आम्ही पश्चिम बंगाल सरकारने ८ मे रोजी चित्रपटावर घातलेली बंदी उठवत आहोत. या बंदीला कोणताही ठोस आधार दिसत नाही.

The Kerala Story
Satyaprem Ki Katha Teaser Release: ‘सत्यप्रेम की कथा’ चा जबरदस्त टीझर रिलीज, कार्तिकसोबत रोमॅन्टिक झाली कियारा

ते पुढे म्हणाले की, तामिळनाडू सरकारने कोणतेही निर्बंध लादलेले नसल्याचे वक्तव्य आम्ही रेकॉर्डवर घेत आहोत. चित्रपटगृह मालकांवर चित्रपट न दाखवण्यासाठी कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. चित्रपट दाखवणाऱ्या सिनेमागृहाला पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी, अशा सूचना आम्ही देत ​​आहोत. सरकार किंवा त्याच्याशी निगडित लोकांनी थिएटर मालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com