Supriya Sule: सुप्रिया सुळेंना 'या' वेबसीरिजची पडली भुरळ, पंकज त्रिपाठींसोबत साधला थेट संवाद...

नुकतचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या आवडत्या वेबसीरिजबद्दल सांगितले आहे.
Supriya Sule
Supriya SuleSaam Tv

Supriya Sule: आपल्या धकाधकीच्या आयुष्यात काही विरंगुळ्याचे क्षण मिळावे यासाठी राजकारणी प्रयत्न करत असतात. पण असे काहीच राजकारणी आहेत, ते आपली आवड नेहमी जोपासण्याचा प्रयत्न करतात. नुकतचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या आवडत्या वेबसीरिजबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

Supriya Sule
Suhana Khan Post: सुहाना खानच्या फोटोवर शाहरुख खानची भन्नाट कमेंट, म्हणाला 'तू घरी घालतेस तेच कपडे...'

एका मुलाखतीत, सुप्रिया सुळे म्हणतात, मिर्झापूर (Mirzapur Web Series) ही वेबसीरिज माझी आवडती वेबसीरिज आहे. मी ही सिरीज पाहिल्यानंतर कालिन भैय्या पंकज त्रिपाठींना (Pankaj Tripathi) फोन केला. मला अनुप्रिया पटेलनं त्यांचा नंबर दिला. मी त्यांची फॅन असल्याचं सांगितलं.

Supriya Sule
Pathaan Controversy: 'पठान'चित्रपटावर 'या' राज्यात बंदी, निर्मात्यांनी उचलले महत्वाचे पाऊल...

कालिन भैय्याचं पात्र मला खूप आवडलं असल्याचं मी त्यांना सांगितलं. मला पंकज त्रिपाठी म्हणतात, मी बारामती, सातारा, फलटण या भागात फिरलो आहे. मी बराच वेळ त्यांच्या सोबत बोलले. 'अमर अकबर अॅंथोनी' हा चित्रपटही त्यांच्या आवडीचा असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.

Supriya Sule
Athiya-KL Rahul Wedding:अथिया- केएल राहुलला दिल्या मान्यवरांनी शुभेच्छा, कलाकारांसह क्रिकेट जगतातील दिग्गजांनी केला कमेंटचा वर्षाव...

सोबतच पुढे सुप्रिया सुळे म्हणतात, मी अँटी तंबाखू आहे. मला ड्रग्जचा प्रचंड राग येतो, ड्रग्ज आणि तंबाखू दोन्ही गोष्टी तेवढ्याच खतरनाक आहेत, असं त्यांनी सांगितलं. या मुलाखतीत त्यांनी आईपण, पवार कुटुंब तसेच सदानंद सुळे यांच्या व्यवसायाबद्दल देखील माहिती दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com