लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सुरेखा पुणेकरांनी मराठमोळी लावणी सातासुद्रापार नेली. घरची परिस्थिती बेताची आणि जेमतेम शिक्षण असल्याने त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी पायात घुंगरू बांधले
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत आपण कलेची (Arts) सेवा केली. आता राजकारणात येऊ आपल्याला कलाकरांसह महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासूनच सुरेखा पुणेकर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र कॉग्रेसन तिकीट न दिल्यामुळे त्या निवडणूक लढवू शकल्या नाहीत. त्यानंतर भाजपा कडूनही त्यांना तिकीट मिळणार असल्याचे म्हटले जात होते. पण काही त्यांना भाजपाकडूनही तिकीट मिळाले नाही. मात्र, येत्या 16 सप्टेंबरला मुंबईच्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये त्यांच्या पक्षप्रवेश होणार आहे. चित्रपट, कला, साहित्य, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करतील.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश
#KalyanSingh | उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन | RIP Kalyan Singh

लावणी म्हटलं की सुरेखा पुणेकर याचं नाव सर्वात आधी ओठांवर येतं. सुरेखा पुणेकरांनी मराठमोळी लावणी सातासुद्रापार नेली. घरची परिस्थिती बेताची आणि जेमतेम शिक्षण असल्याने त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी पायात घुंगरू बांधले. ‘या रावजी’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘कारभारी दमानं’ अशा एक ना अनेक लावण्यांनी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले. मराठी बिग बॉसमध्येही त्यांनी आपले नशीब आजमावले. अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी परीक्षक म्हणूनही सहभाग घेतला.

Edited By- Anuradha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com