Sushant Singh Rajput Birthday: 'पी के'मधील भूमिकेसाठी सुशांतने घेतले होते फक्त २१ रुपये, काय होतं यामागचं कारण

सुशांतने 2013 मध्ये आलेल्या 'काई पो चे से' या चित्रपटातून बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात केली.
Sushant Singh Rajput In PK Movie
Sushant Singh Rajput In PK MovieSaam Tv

Sushant Singh Rajput Birthday Special: संपूर्ण ज्याच्या निधनाने बॉलीवूड हादरलं. ज्याचे चाहते आजही त्याच्यासाठी सोशल मीडियावर त्याच्या नावाचे ट्रेंड करण्याचे धाडस कर आहेत. आम्ही बोल्ट आहोत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी. आज म्हणजे २१ जानेवारीला सुशांतचा वाढदिवस आहे.

१४ जून २०२० रोजी सुशांतने या जगाचा निरोप घेतला. सुशांतने त्याच्या अभिनयाने आणि स्वभावामुळे चाहत्यांची मने जिंकली होती. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही गोष्टी.

Sushant Singh Rajput In PK Movie
Anant Ambani-Radhika Merchant Engagement: जाणून घ्या कसा पार पडला अनंत अंबानी-राधिका मर्चंड यांचा साखरपुडा

सुशांत हा अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याला विसरणे त्याच्या चाहत्यांसाठी अशक्य आहे. टीव्ही ते बॉलीवूडचा प्रवास त्यांनी स्वतःच ठरवला होता. अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत 'पवित्र रिश्ता' या टीव्ही शोमध्ये सुशांत पहिल्यांदा दिसला होता. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले. सुशांतचा 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट चाहत्यांना आजही आवडतो. या चित्रपटात अभिनेत्याने आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली होती.

सुशांतने 2013 मध्ये आलेल्या 'काई पो चे से' या चित्रपटातून बॉलीवूडमधील करिअरची सुरुवात केली. यानंतर तो 'पीके', 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी'मध्ये दिसला. सुशांतच्या करिअरचा टर्निंग पॉईंट म्हणजे 2016 साली प्रदर्शित झालेला 'एमएस धोनी द अनटोल्ड' हा चित्रपट. या चित्रपटाने 250 कोटींचे कलेक्शन केले होते. याशिवाय सुशांत केदारनाथ आणि 'सोनचिरैया'मध्येही दिसला आहे. 'छिछोरे' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट होता. तर त्यांच्या निधनानंतर त्याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

पडद्यावर उत्तम व्यक्तिरेखा साकारण्या सुशांतचे मन देखील मोठे होते. राजकुमार हिरानी यांच्या पीके या चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये घेत असे, पण या चित्रपटातील 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी त्याने राजकुमार हिराणीकडून एकही पैसा घेतला नाही. नंतर राजकुमार हिरानी यांनी सुशांतला 21 रुपये शगुन म्हणून दिले आणि अभिनेत्याने ते आनंदाने स्वीकारले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com