Sushmita Sen : तू हॉट दिसतेस... सुष्मिता सेनचा स्विमिंग करतानाचा व्हिडिओ बघून ललित मोदी फिदा!

विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत आहे.
lalit modi and sushmita sen dating
lalit modi and sushmita sen datingsaam tv

Lalit Modi Comment On Sushmita Sen Video| मुंबई: विश्वसुंदरी आणि बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen) गेल्या अनेक दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रकाशझोतात आली आहे.

lalit modi and sushmita sen dating
Janhvi Kapoor Boyfried : रिलेशनशिपबद्दल जान्हवी कपूरचा खुलासा; म्हणाली, फक्त जवळीक...

सुष्मिता सेनने आपल्या(Instagram) इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती समुद्रात पोहोताना दिसतेय. सुष्मिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओ पोस्टवरील एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ललित मोदीने ही कमेंट केली आहे.

lalit modi and sushmita sen dating
Karan Mehra-Nisha Rawal Case: करण मेहराला हवाय आता मुलाचा ताबा, म्हणाला...

तू हॉट दिसतेस अशी कमेंट ललित मोदी याने केली आहे. तत्पूर्वी, सुष्मिताने समुद्रात पोहतानाचा व्हिडिओ शेअर करताना पोस्टमध्ये सुंदर कॅप्शन लिहिली आहे. 'समर्पण ही एक शिकवण आहे. जसं की समुद्रात पोहोण्याचा मी अनुभव घेत आहे, असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

सुष्मिता या व्हिडिओत खूपच सुंदर दिसत आहे. ब्लॅक आणि व्हाइट टॉपमध्ये ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ती समुद्रात उडी घेत आहे. हा व्हिडिओ बघून तिचे चाहते आणि फॉलोअर्स तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर ललित मोदी याने एक कमेंट करून सगळ्यांचे लक्ष पुन्हा वेधले आहे. सार्डिनियामध्ये हॉट दिसत आहे, असं त्याने म्हटलं आहे.

गेल्याच महिन्यात ललितने सुष्मितासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून दोघेही जोरदार चर्चेत आहेत.

याआधी सुष्मिता मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. २०१८ मध्ये दोघांचीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. गेल्या वर्षी तिचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त आले होते. सुष्मिताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केली होती, "आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली, आम्ही मित्रच राहिलो!! नात्यात दुरावा निर्माण झाला असला तरी, प्रेम कायम आहे, असं तिने सांगितले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com