Ranveer Singh : न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली स्वरा भास्कर

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. जिथे काही नेटकरी त्याच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत तर, काही नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
Swara Bhaskar has also expressed her displeasure on Ranveers photos
Swara Bhaskar has also expressed her displeasure on Ranveers photosSaam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. जिथे काही नेटकरी त्याच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत तर, काही नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटबाबत सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर त्याच्या न्यूड फोटोशूटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही(Swara Bhaskar) रणवीरच्या फोटोंवर नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Swara Bhaskar has also expressed her displeasure on Ranveers photos
VIDEO: 'डंकी'च्या सेटवरचा किंग खानचा व्हिडिओ झाला लीक; काय तो लूक, सगळंच 'जबरा' वाटतंय

स्वराने रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर आपले मत मांडले. जे रणवीरच्या फोटोंवर आपला राग व्यक्त करत आहेत, त्यांनी आपले विचार इतरांवर लादू नयेत. रणवीरचे फोटो हा 'नैतिक मुद्दा' नाही, असे ती म्हणाली. स्वराने रणवीरच्या न्यूड फोटोशूटबद्दल ट्विट केले असून, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Swara Bhaskar has also expressed her displeasure on Ranveers photos
Good Bye Release Date : अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र'नंतर करणार 'गुडबाय';श्रीवल्लीसोबत...

न्यूड पोज दिल्याबद्दल काहींनी रणवीरचे कौतुक केले, तर काहींनी त्याच्यावर आक्षेप घेतला. स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांना थेट सवाल केला. देशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर गप्प का आहेत, असं तिनं विचारलं. रणवीरच्या फोटोंवर ज्यांना आक्षेप असेल अशा लोकांनी ते पाहू नयेत, असेही तिने ट्विटमध्ये सुनावले.

'भारतात दररोज अन्याय आणि अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. पण आमची नाराजी रणवीर सिंगच्या फोटोंवरच आहे. मला असे म्हणायचे आहे की तुम्हाला ते आवडत नसेल तर पाहू नका, परंतु तुमचे मत आमच्यावर लादू नका. हा नैतिक मुद्दा नाही!', असे स्वरा भास्कर आपल्या ट्विटमध्ये म्हणाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com