Swara Bhaskar: स्वरा भास्करचा राहुल गांधी यांना पाठिंबा, ट्विट करत केले देशातील राजकीय परिस्थतीवर भाष्य

स्वराने केवळ बॉलिवूडच्याच नाही तर राजकारणाच्या विषयावरही तिची मते उघडपणे मांडली आहेत.
Swara Bhaskar Viral Tweet
Swara Bhaskar Viral Tweet Saam Tv

मुंबई: स्वरा भास्कर ही अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जी प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टपणे आपले मत व्यक्त करताना दिसते. स्वराने केवळ बॉलिवूडच्याच नाही तर राजकारणाच्या विषयावरही तिची मते उघडपणे मांडली आहेत. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो यात्र' करीत आहेत. राहुल गांधींचा सध्या हा प्रवास दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुरू आहे. या यात्रेला काँग्रेसचे मित्रपक्षही जोरदार सहकार्य करत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला पाठिंबा दिला आहे. स्वराने ट्विट करत राहुल गांधींचे कौतुक केले आहे.

Swara Bhaskar Viral Tweet
Ved First Look: देशमुखांची सून होणार मराठी चित्रपटाची नायिका, तिचा नवराच करतोय चित्रपटाचे दिग्दर्शन

स्वरा भास्करने एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ ट्विट केला आहे, त्या व्हिडिओमध्ये 'भारत जोडो यात्रा' आणि राहुल गांधी यांच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले आहे की, 'श्रेय घ्यायचे अजून बाकी आहे... निवडणुकीतील पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि सततची टीका निष्क्रिय ठरले आहेत, राहुल गांधी ना जातीय वक्तृत्वापुढे झुकले आहेत ना राजकारणापुढे. या देशातील परिस्थिती पाहता 'भारत जोडो' करण्यात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत! (Viral)

स्वरा भास्करचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी स्वरा आणि राहुल यांचे कौतुक केले आहे. काही लोकांनी स्वरा भास्करलाही या प्रवासात येऊन राहुल गांधींना पाठिंबा देण्यास सांगितले आहे. एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही या प्रवासात का नाही आहात? त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. तसेच काही लोकांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार म्हणून संबोधले आहे. स्वराने राहुल गांधींचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिने राहुल गांधींचे कौतुक केले आहे. (Social Media)

स्वरा भास्कर 'जहां चार यार' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट कमल पांडे यांनी दिग्दर्शित केला होता आणि यात स्वरासह मेहर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. आता स्वरा लवकरच 'मिसेस फलानी'मध्ये दिसणार आहे. (Bollywood)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com