महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरील 'त्या' ट्विटमुळे स्वरा भास्कर झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर ट्विट करून या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर मत मांडले आहे. परंतु हे ट्विट पाहिल्यानंतर अनेक नेटकरी स्वरा भास्करला राजकारणाचे धडे शिकवताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरील 'त्या' ट्विटमुळे स्वरा भास्कर झाली ट्रोल
Swara Bhaskar get troll for Her twitSaam Tv

मुंबई: शिवसेना(shivsena) नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं तिच्या सोशल मीडिया(social media) अकाउंटवरून ट्विट केलं. पण या ट्विटमुळे ती ट्रोल झाली. काही नेटकऱ्यांनी समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी तिला खडे बोल सुनावले आहेत.

Swara Bhaskar get troll for Her twit
Drishyam 2: अजय देवगणचा क्राईम अॅण्ड थ्रिलर चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणारं ट्विट स्वरा भास्कर हिनं केलं. आपण मतदान करतोच कशाला? निवडणुकांऐवजी दर पाच वर्षांनी बंपर सेल लावा, असं तिनं ट्विटमध्ये म्हटलं.

Swara Bhaskar get troll for Her twit
अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर; शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने होती अटकेत

स्वरा भास्करवर संतापले नेटकरी

स्वरा भास्करच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी तिला ट्रोल केलं आहे. 'एक गोष्ट लक्षात ठेव, सर्वात आधी तू दिल्लीची मतदार आहेस, महाराष्ट्राची मतदार बनू नकोस,' असं एका यूजरनं म्हटलं आहे. 'तुम्ही कुठे मत देता?' असा प्रश्न एका यूजरनं तिला केला.

आणखी एका यूजरने प्रतिक्रिया दिली आहे. 'हे बघ, पहिली गोष्ट तू दिल्लीची मतदार आहेस, महाराष्ट्राची मतदार होऊ नकोस. दुसरे म्हणजे महाराष्ट्राने भाजप आणि शिवसेनेला मतदान केले होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. म्हणून तू अडीच वर्षे शांत बसली होतीस. तर आता ही तशीच शांत बसून राहा', असे त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'कोणी तरी या मॅडमना समजावून सांगा की लोकांनी भाजप-शिवसेना युतीला मत दिले होते. तेव्हा कोणता सेल चालू नव्हता', असे आणखी एका यूजरने सुनावले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com