VIDEO:राजू श्रीवास्तवबद्दल विचारल्यानंतर कॅमेरामनवर भडकली तापसी

तापसी पन्नूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
taapsee pannu
taapsee pannu Saam Tv

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu)पुन्हा एकदा तिच्या गैरवर्तनामुळे प्रकाशझोतात आली आहे. विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असतानाच सेलिब्रिटी त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. बुधवारी अनेक बॉलीवूड कलाकारांनी राजूचा फोटो शेअर करत दुख व्यक्त केले आहे. नुकताच पापाराझींनी तापसी पन्नूला बघताच गर्दी केली आणि राजू श्रीवास्तवबद्दल विचारले असता. ती भडकली आणि रागात काय बोलू?' म्हणत पुढे निघून गेली.

सोशल मीडियावर (Social Media) तापसीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तापसी पन्नूला पाहताच सर्व कॅमेरे आणि माइक तिच्या दिशेने फिरल्याचे दिसते आहे. आणि ती अस्वस्थ झालेली दिसते आहे. दरम्यान काही वेळातच राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूबाबत विचारले असता, तापसी म्हणाली मी काय बोलू? आणि तेथून तिने जाण्यासाठी मार्ग काढला. ती म्हणाली तुम्ही बाजूला व्हा. असं करू नका धन्यवाद म्हणत निघून गेली '.

taapsee pannu
5D Movie : 'ब्रह्मास्त्र' आणि 'अवतार २' चा रेकॉर्ड मोडणार 'हा' बॉलिवूड चित्रपट; रणवीर अक्षय आणि अजय देवगण दिसणार मुख्य भूमिकेत

तापसी पन्नूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्सला तिची ही वागणुक आवडली नाही आहे. अनेकांनी तिला कमेंट करत तिच्यावर निशाणा साधला आहे. एकाने, 'तापसी आता गर्विष्ठ झाली आहे', तर दुसऱ्याने 'कंगना रणौत २.०' असं म्हटलं आहे. याचबरोबर सोशल मीडियावर तापसी पन्नूच्या समर्थनात तिचे काही चाहते आहेत. एकाने 'कुठे आहेत तिची सुरक्षारक्षक, जी स्वत:ची सुरक्षा करत आहे', तर दुसऱ्याने पापाराझींवर खरपूस समाचार घेत म्हटले, 'यांना कोणाशी काही देणेघेणे नाही.. पण फोटो द्या' असे म्हटलं आहे.

अलीकडे, तापसी पन्नूने ओटीटी प्ले अवॉर्ड्स २०२२ मध्ये रेड कार्पेटवर मीडिया संवादादरम्यान पापाराझींवर चिडली होती. एका पत्रकाराने अभिनेत्रीला 'दोबारा' चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याबद्दल प्रश्न केला होता, तेव्हा तापसी भडकलेली पाहायला मिळाली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com