Taapsee Pannu: शाहरुख खानसोबत काम करणं माझं सौभाग्य, डंकी चित्रपटानंतर तापसी पन्नूने व्यक्त केली भावना

तापसी पन्नूचा 'ब्लर' ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर प्रदर्शित होणार.
Taapasee Pannu says thanks to her fans
Taapasee Pannu says thanks to her fansInstagram @taapasee

Taapsee Pannu Movie Update: तापसी पन्नू तिच्या भूमिकांनी तिच्या चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करत असते. 'दोबारा' आणि 'शाबास मिठू' या चित्रपटांनंतर, तापसी पन्नूचा आणखी एक लीड रोल असलेला चित्रपट 'ब्लर' देखील 9 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: तापसी पन्नूने तिच्या आउटसाइडर्स फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. 'डंकी' चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळणे हे सौभाग्य आहे, असे तापसीने सांगितले आहे.

Taapasee Pannu says thanks to her fans
Bigg Boss Marathi 4: 'विश्वासघातकी आहे ही मुलगी' किरण मानेंचा अमृता धोंगडेंवर थेट आरोप

प्रत्येकजण आपल्या मुलावर प्रेम करतो. मी नेहमी प्रयत्न करत असते की मी अशाच चित्रपटात काम करेन जो पाहण्यात कोणाचाही वेळ वाया जाणार नाही. 'ब्लर'सारखा चित्रपट तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. हा एक भयपट आहे, ज्यात भूत नाही. ज्या लोकांना थ्रिलर चित्रपट पहायला आवडतात ते हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील. मी कलाकार म्हणून हा चित्रपट साइन केला होता. निर्माता म्हणून मी अजून चित्रपट करत होते, ज्यात मी अभिनय करत नाही. मला माझ्या पद्धतीने हा चित्रपट बनवायचा असल्याने मी स्वतः 'ब्लर'ची निर्मिती करावी, असे मला वाटले.

'लूप लपेटा' नंतर 'ब्लर' असे या वर्षी माझे दोन चित्रपट ओटीटीवर येत आहेत. 'दोबारा', 'शाबास मिठू' थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. पुढच्या वर्षी ओटीटीवर किती चित्रपट येतील माहीत नाही. जर माझे चाहते मला कुठेही पाहत असतील आणि मला त्यांच्या आयुष्यातील वेळ देत असतील. तर त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आज कोणालाच वेळ नाही. पैसे मिळवता येतात, पण वेळ नाही. माझे चाहते माझा चित्रपट कुठेही ओटीटी किंवा थिएटर्समध्ये कुठेही पाहतात. त्यामुळे माझ्यासाठी यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com