Dunki : शाहरुख खानसोबत 'डंकी'मध्ये दिसणार तापसी पन्नू? फोटो झाले व्हायरल

बॉलिवूडचा किंग खान तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शाहरुख खानचे एक नव्हे, तर तीन-तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
Shahrukh Khan And Taapsee Pannu
Shahrukh Khan And Taapsee PannuSaam Tv

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान(Shahrukh Khan) तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शाहरुख खानचे एक नव्हे, तर तीन-तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामुळे शाहरुख खान सध्या खूप चर्चेत आहेत.

Shahrukh Khan And Taapsee Pannu
Malaika Arora : मलायका अरोराचा 'असा' बोल्ड लूक याआधी कधीच पाहिला नसेल; ट्रान्सपरंट...

सगळ्यात आधी शाहरुखचा 'पठाण'(Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित होईल. त्यानंतर 'जवान'(Jawan) आणि शेवटी 'डंकी'(Danki) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही सिनेमाचे पोस्टर रीलीज करण्यात आले आहेत. परंतु 'डंकी' या सिनेमाविषयी सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहेत. 'डंकी'ची कथा काय असेल? यात शाहरुखचा लूक कसा असेल? शाहरुख खानसोबत या सिनेमात नक्की कोणती अभिनेत्री असेल? या सर्व गोष्टी निर्मात्यांनी अत्यंत गुप्त ठेवल्या आहेत. 'डंकी'या सिनेमाचे शूटिंग सध्या परदेशात केले जात आहे. तेथून आता काही फोटो लीक झाले आहेत. ज्यावरून या सिनेमात शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू(Taapsee Pannu) देखील दिसणार असल्याचे समोर आले आहे.

Shahrukh Khan And Taapsee Pannu
Friday Release: जुलैचा शेवटचा शुक्रवार मनोरंजनाने भरलेला; 'हे' चित्रपट - सिरीज होणार प्रदर्शित

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे जो 'डंकी'च्या सेटवरचा आहे. या फोटोत शाहरुख खान दिसत आहे पण सर्वांच्या नजरा या फोटोतील शाहरुख खानच्या मागे उभ्या असलेल्या अभिनेत्रीवर खिळल्या आहेत आणि ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून तापसी पन्नू आहे. त्यामुळे 'डंकी'मध्ये तापसी शाहरुख खानसोबत या सिनेमाचा एक भाग असेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

'झिरो'नंतर शाहरुख खान रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 'पठाण' हा सिनेमा जानेवारी २०२३ मध्ये रीलीज होणार आहे. ज्यामध्ये शाहरुख खान दीपिका पदुकोणसोबत जबरदस्त स्टाइलमध्ये दिसणार आहे. यानंतर 'जवान' हा सिनेमा २ जूनला २०२३ रोजी रीलीज होणार आहे. ऍटली कुमार या सिनेमाचे दिग्दर्शिन करत असून या चित्रपटात साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा असणार आहे. नयनतारा शाहरुखसोबत 'जवान' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमातून शाहरुख खानचा फर्स्ट लूकही रीलीज करण्यात आला आहे. त्याचवेळी, शाहरुख खानचा प्रदर्शित होणारा तिसरा सिनेमा 'डंकी'चे शूटिंग सध्या सुरू आहे आणि हा सिनेमा २०२३ च्या शेवटी प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com