Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: जेठालालच्या वडिलांना गंभीर दुखापत, चाहत्यांची वाढली चिंता

'बापूजी'ची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट शूटिंग दरम्यान सेटवर जखमी
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Amit Bhatt Got Injured
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Amit Bhatt Got InjuredSaam Tv

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या मालिकेत 'बापूजी'ची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट शूटिंग दरम्यान सेटवर जखमी झाला, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, 'चंपकलाल' आणि 'चंपक चाचा' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता अमित भट्ट 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका सीनचे शूटिंग करत होता. एक सीन करताना अमितला पाळायचे होते. परंतु त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Amit Bhatt Got Injured
Tabassum Govil Passed Away: मनोरंजन विश्वावर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन

दुखापतीनंतर अमित भट्ट यांना दाखवण्यात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. चंपक चाचाच्या दुखापतीची बातमी समोर येताच चाहत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते 'चंपक चाचा'ला संपूर्ण सहकार्य करत आहेत आणि अमित भट्ट पूर्णपणे बरा झाल्यावरच शूटिंग पुन्हा सुरू करेल. (Program)

अमित भट्ट अनेक वर्षांपासून बापूजींची भूमिका साकारत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमित भट्ट जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण शोमध्ये जेठालालच्या वडिलांची भूमिका करत आहे. अमित भट्ट यांना खऱ्या आयुष्यात दोन जुळे मुलगे आहेत. अमित भट्ट हे हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अमित भट्ट यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे पण त्यांना ओळख फक्त 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून मिळाली. (Actor)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी टीव्ही मालिका 2008 पासून प्रसारित होत आहे. आजही प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे. या टीव्ही मालिकेमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. 14 वर्षांनंतरही या मालिकेची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे नाव टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. (TV)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com