'ही तर हुबेहूब दयाबेनचं'; व्हायरल व्हिडीओवर तारक मेहता निर्मातेही 'कन्फ्यूज'

टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv

मुबंई: टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील पात्रांमुळे आणि त्याच्या भन्नाट अभिनय शैलीमुळे शो प्रेक्षकांच्या पंसतीस आहे. या शोबद्दल अनेक अपडेट्स समोर येत असतात. कधी शोमधील नवीन कलाकारांच्या एन्ट्रीबद्दल तर कधी शो सोडणाऱ्या अभिनेत्याबद्दल.

मात्र आजही प्रेक्षक दयाबेनच्या व्यक्तिरेखेला आठवत आहे. दयाबेन कधी परतणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांशी केवळ अभिनयानेच नाहीतर त्याच्यांशी जोडलेले देखील पाहायला मिळालेत.जर तुम्हीही दयाबेनचे संवाद आणि अभिनयाच्या आठवणीत असाल, तर आज आम्ही तुम्हाला ९ वर्षांच्या छोट्या दयाची ओळख करून देणार आहोत, जिच्या कौशल्याने तुमच्याही आठवणी जाग्या होणार आहेत.

तारक मेहता का उल्टा चश्मा शोचे (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)चाहते सोशल मीडियावर दयाबेनचे व्हिडिओ शेअर करत असतात. दरम्यान, आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दिशा वकानीच्या चाहते दयाबेनच्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडीओमध्ये चाहते दयाबेनसारखा अभिनय करत आहे. व्हिडीओमधल्या या छोट्या 'दयाबेन'ला पाहून तारक मेहता चाहत्यांनी प्रतिक्रिया देत, म्हणाले 'अरे हीलाच दयाच्या भूमिकेत घ्या.

 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
प्रियांका चोप्राच्या डोळ्यात पाणी का आले? व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी

व्हिडिओमध्ये छोटी दयाबेन दिशा वकानीचा अभिनय साकारताना बोलते- 'अंजली भाभी, हा तर नवरात्रीचा सण आहे, यामध्ये नाचतात नाहीतर दांडीया खेळतात, आणि तुम्ही काय बोलताय की, अंताक्षरी खेळायचं- बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम !'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधील दयाबेनची व्यक्तिरेखा सुमनला खूप आवडते, यामुळेच सुमन दयाबेनच्या पोशाखात व्हिडिओ शेअर करत असते. सुमनने तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये लिहिले आहे की, तिला मिमिक्री करायला आवडते. ९ वर्षांच्या 'दयाबेन'चा अभिनय पाहून चाहते तिच्या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. सुमनचा आणखी एक बापूजींसोबत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Alia Bhatt : मी ब्रा लपवून का ठेवू?; 'ट्रोल'धाडीवर आलिया भट्टनं ट्रोलर्सवर काढला राग

छोट्या पडद्यावरचा दिर्घकाळ चालणारा कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रेक्षकांचा चांगलाच पंसतीचा आहे. गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेल्या टेलिव्हिजन सुप्रसिध्द शोच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.शो मध्ये सुरुवातीपासून दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून शोपासून दुरावली आहे. अलीकडेच दया प्रसूती रजेवर होती. मात्र त्यानंतर ती शोमध्ये दिसली नाही. म्हणूनच प्रेक्षक दिशा वाकानीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com