
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Update: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील पात्रांशी प्रेक्षकांचे एक वगेळेच भावनिक नाते आहे. ही पात्र मालिकेत दिसली नाहीत तर प्रेक्षकांना त्यांच्याविषयी काळजी नई कुतूहल दोन्ही निर्माण होते. या मालिकेतील एक प्रसिद्ध पात्राची गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहता आहेत.
दिशा वकानी म्हणजे दयाबेनला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. जेठालाल आणि दया यांची आयकॉनिक जोडी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दिसलेली नाही. ही जोडी भारतीय टेलिव्हिजनवरील हिट जोड्यांपैकी एक आहे. दयाची भूमिका करणारी दिशा वकानी 2015 पासून TMKOC चा भाग नाही.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो मधील सर्वात प्रसिद्ध पात्रांपैकी तिचे पात्र आहे. दिशा वकानी तिच्या विशिष्ट अभिनय क्षमता, मजेदार संवाद आणि हावभाव यांमुळे गेल्या काही वर्षांत मोठा चाहता वर्ग जमा केला आहे. दिशा शोमध्ये पुन्हा येणार आहे की नाही हे अद्याप निश्चित झाले नाही.
परंतु ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी नवीन टपूच्या पात्राला मात्र मालिकेत जागा दिली आहे. अभिनेते नितीश भलुनी शोमध्ये राज अनाडकटच्या जागी तपूची भूमिका साकारणार आहेत . त्यानंतर टापूचे ऑन-स्क्रीन वडील जेठालाल यांची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्यासोबत माध्यमांना संवाद साधला आहे.
दरम्यान यावेळी दया उर्फ दिशा वकानी शोमध्ये परतणार का? असे विचारले असता दिलीप जोशी म्हणाले, “हे पूर्णपणे निर्मात्यांवर अवलंबून आहे. त्यांना बदलून नवीन कलाकारांना कास्ट करायचे आहे की नाही हे ते ठरवतील.”
दिलीप जोशी यांनी दयाळ मिस करत असल्याचे देखील यावेळी सांगितले. "एक अभिनेता म्हणून मला दया या व्यक्तिरेखेची आठवण येते. तुम्ही सर्वांनी बर्याच दिवसांपासून दया आणि जेठालालच्या चांगल्या आणि मजेदार सीनचा आनंद घेतला नाही. दिशा गेल्यापासून दया आणि जेठाचा तो मजेदार भाग, तो अँगल ती केमिस्ट्री गायब आहे.
लोकही तेच सांगत आहेत. बघूया, मी नेहमीच सकारात्मक असतो, असित भाऊ नेहमीच सकारात्मक असतात. त्यामुळे काही अजून चांगलं मनोरंजक घेऊन आम्ही समोर येऊ शकतो. कल किसने देखा."
नितीश, 'तारक मेहता का उलटा चश्मा'च्या कलाकारांमध्ये सामील झाले. त्याने दिलीप जोशी सोबत काम करण्यासाठी किती उत्साही आहे याबद्दल सांगितले. ते म्हणले, “दिलीपजींना माहित आहे की पात्र कसे असावे आणि शोमधील पात्राप्रमाणे कसे जगावे.
जेव्हा सरांचे सीन चालू असतात, तेव्हा मी बसून कॅमेऱ्यात पाहतो की ते जेठालालचे व्यक्तिमत्त्व कसे टिपतात.” त्याला उत्तर देताना दिलीपने म्हणले, "हा क्षण टपूबद्दल अधिक जाणून घेण्याचा आहे, चला माझी प्रशंसा करू नका, त्याच्याबद्दल बोलूया."
दरम्यान, 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वाधिक काळ चालणारी विनोदी मालिका आहे. आता दिशा वकानीच्या जागी कोण येणार की, निर्माते शेवटी जुन्या दयाबेनला परत येण्यास राजी करणार? हे पाहणे मनोरंजक असेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.