Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत नवीन कलाकार शोभत नसल्याची चाहत्यांची तक्रार, निर्मात्यांकडे केली अजब मागणी

शैलेश त्यांची जागा आता अभिनेते सचिन श्रॉफ यांनी घेतली आहे.
Actors From Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Actors From Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News: 'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनेक चढ-उतार आले. काही कलाकार ही मालिका सोडून गेले तर काही हे जग सोडून गेले. काही जुनी पात्र साकारायला नवीन कलाकार आले. त्यातील एक पात्र म्हणजे तारक मेहता. तारक मेहता हे पात्र शैलेश लोढा साकारत होते. शैलेश यांना मालिका सोडून अनेक दिवस झाले आहेत. शैलेश त्यांची जागा आता अभिनेते सचिन श्रॉफ यांनी घेतली आहे.

जेव्हा सचिन श्रॉफ यांनी मालिकेत प्रवेश केला होता तेव्हा #TMKOC हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. ट्विटरवर अनेक युजर जुन्या तारक मेहतांना पुन्हा मालिकेत आणण्याची मागणी करत होते.

Actors From Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Anushka Sharma: 'चकदा एक्सप्रेस'चे रॅप अप, अनुष्काने शेअर केले सेटवरील खास फोटो

ट्विटरवर ट्रेंड करत असलेल्या #TMKOC या हॅशटॅगद्वारे प्रेक्षक सचिन श्रॉफच्या जागी शैलेश लोढा यांनी परत आणावे अशी मागणी करत आहेत. अनेक युजर्सना सचिन श्रॉफने शैलेश लोढा यांची घेतलेली जागा आवडली नव्हती. तेव्हा ट्विटरवर यासंदर्भात अनेक मीम्स आणि जोक्स व्हायरल होत होते. काही युजर्सनी निर्मात्यांना धमकी दिली होती की, ते शो पाहणे बंद करतील.

जून 2022 मध्ये शैलेश लोढा यांनी शो सोडल्याची बातमी समोर आली होती. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार शैलेश लोढा त्यांच्या करारामुळे आणि विविध व्यावसायिक कारणांमुळे खूश नव्हते आणि म्हणूनच त्यांनी शो सोडला.

ट्विट करत युजर म्हणत होते की, सचिन श्रॉफ तारक मेहतांच्या भूमिका अजिबात सूट होत नाहीत. काहींनी तर जुने तारक मेहता उर्फ ​​शैलेश लोढा यांना शोमध्ये परत आणण्याची मागणी केली होती. शैलेश लोढा यांची जागा घेणे सचिन श्रॉफसाठी सुद्धा कठीणच होते. शैलेश लोढा बराच काळ हा शो होस्ट करत होते आणि एक महत्त्वाचे पात्र साकारत होते.

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांचे दयाबेन उर्फ ​​दिशा वकानीबाबत केलेले वक्तव्यही तेव्हा समोर आले होते. 'दया भाभीची व्यक्तिरेखा प्रेक्षक विसरू शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. 'तिची उणीव प्रेक्षकांना जाणवते. मी दिशा वकानीच्या निर्णयाचा आदर करतो. कोरोनाच्या कालावधीपर्यंत मी तिची वाट पाहिली. उलट, आजही मी तिची वाट पाहत आहे की देव त्यांना शोमध्ये परत येण्याची इच्छा देईल. पण तिच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत आणि मी ते समजू शकतो. पण मी अजूनही तिची वाट पाहत आहे.'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com