तब्बूचा आगामी चित्रपट; 'खुफिया' होणार नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित

२०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर लवकरच तब्बूचा आगामी चित्रपट 'खुफिया' प्रदर्शित होणार आहे. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचं तब्बूने याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
तब्बूचा आगामी चित्रपट; 'खुफिया' होणार नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित
Tabbu Instagram Saam Tv

मुंबई : सिनेसृष्टीतील अभिनेत्री(actress) तब्बू (tabbu)हिने हिंदीसोबत तमिळ आणि तेलगू चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे. तब्बू सध्या 'भूल भुलैया २'(Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंजुलिका आणि मंजुलिकाच्या दुहेरी भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याचबरोबर तब्बूने हेराफेरी, हम साथ साथ हैं, दृश्यम, गोलमाल अगेन, अंधाधुन अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तब्बूचा लवकरच नवीन चित्रपट(movies) देखील प्रदर्शित होणार आहे.

Tabbu Instagram
5 Years Of Raabta : सुशांतसिंहच्या आठवणींनी कृती सेनन भावुक, गायलं हे खास गाणं

२०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर लवकरच तब्बूचा आगामी चित्रपट 'खुफिया' प्रदर्शित होणार आहे. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचं तब्बूने याबाबत अनेक खुलासे केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बू आगामी चित्रपट 'खुफिया'साठी खूप उत्सुक आहे. एका मुलाखतीदरम्यान तब्बूने सांगितले की, 'नेटफ्लिक्सचा 'खुफिया' हा चित्रपट गुप्तहेर या विषयावर आधारित आहे. यात विशाल भारद्वाज यांचा सिग्नेचर टच आहे. सत्य घटनांनी प्रेरित हा चित्रपट लेखक अमर भूषण यांच्या 'एस्केप टू नोव्हेअर' या लोकप्रिय गुप्तहेर कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात अली फजल, वामिका गब्बी आणि आशिष विद्यार्थी यांच्याही भूमिका आहेत.

Tabbu Instagram
सैराटची 'आर्ची' येतेय नवीन अवतारात, चित्रपटाचा ट्रेलर पाहा!

तब्बूने पुढे सांगितले की , 'हा चित्रपट खरोखरच छान बनवला आहे. विशालने हा चित्रपट त्याच्या थरारक स्टाईलमध्ये बनवला आहे. आम्हाला चित्रीकरण करताना खूप मज्जा आली. आमच्याकडे अनेक उत्तम कलाकारांचा संघ होता. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला. आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली आणि कॅनडामध्ये केलं आहे. आता आशा आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.'

'खुफिया'ची कथा थरारक...

खुफिया' चित्रपटाची कथा कृष्णा मेहरा या 'रॉ' एजंटची गोष्ट आहे, ज्याला गुप्तहेर आणि प्रियकर अशा दुहेरी भूमिका साकारताना भारताच्या संरक्षण गोपनीयतेची तस्करी करणाऱ्यांना शोधण्याचे काम सोपवले जाते. २००३ मध्ये आलेला मकबूल आणि २०१३ मध्ये आलेल्या हैदर यांसारख्या यशस्वी आणि प्रशंसनीय चित्रपटांनंतर विशाल आणि तब्बू अभिनेत्री व दिग्दर्शकया जोडीत या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

'कुत्त्ते'मध्येही दिसणार तब्बू ...

तब्बू ,विशाल भारद्वाज प्रोडक्शनच्या 'कुत्त्ते' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाजहा दिग्दर्शनाच्या जगात पदार्पण करणार आहे. 'कुत्त्ते' या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह, अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन, कुमुद मिश्रा आणि शार्दुल भारद्वाज यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com