उजैनच्या महाकाल मंदिराकडे जात असताना बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात

उजैनच्या महाकाल मंदिराकडे जात असताना बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात
Tanushree duttagoogle

मलायका अरोरानंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आलीय. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या (Tanushree dutta) कारला मध्यप्रदेशच्या उजैन येथे अपघात झाल्याची घटना नुकतीच घडलीय. तनुश्री उजैनच्या महाकाल मंदिरात (Ujjain mahakal temple) दर्शनासाठी जायला निघाली होती. प्रवासादरम्यान तनुश्रीच्या कारचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडलीय. अपघाताची माहिती तनुश्रीने सोशल मीडियावर (social media) शेयर केलीय. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाज ही दुर्देवी घटना घडली. अशी भावना तनुश्रीनं सोशल मीडियावर व्यक्त केलीय. दरम्यान, तनुश्रीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून चाहत्यांकडून तिच्या प्रकृतीची विचारपूसही केली जातेय. तनुश्रीनं लवकर बरं होण्यासाठी चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.

कारला अपघात झाल्यानंतरही तनुश्री दत्ता महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली. मंदिरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ तनुश्रीने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तनुश्रीच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याने तिला व्यवस्थीत चालता येत नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तनुश्रीच्या पायाला दुखापत झाल्याने तिच्या पायाला टाके मारले आहेत. दरम्यान महाकाल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर तनुश्रीने काही फोटोही इंन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. तनुश्रीनं लवकर बरं होण्यासाठी चाहत्यांनीही देवाकडे प्रार्थना केली आहे.

Tanushree dutta
यशोमती ठाकूर यांनी पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं पण...; भाजपच्या महिला आमदाराचा सल्ला

तनुश्री दत्ताने लावले होत 'मीटू'चे आरोप

तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये मी टू प्रकरणावरुन बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांवर आरोप केले होते. तनुश्रीने तिच्यासोबत फिल्म इंडस्ट्रीत झालेल्या वाईट प्रसंगांचा पर्दाफाश केला होता. मी टू प्रकरण न्यायालयातही गेले होते. त्यामुळे तनुश्री दत्ता त्यावेळी लाईमलाईटमध्ये आली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.