Disha Vakani: दयाबेन फक्त मालिकेतच नाही तर चित्रपटांतही होती अव्वल, शिक्षण पाहून व्हाल अवाक...

'सब' टिव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सर्वच कलाकारांचा चाहता वर्ग वेगळाच आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv

Disha Vakani: 'सब' टिव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सर्वच कलाकारांचा चाहता वर्ग वेगळाच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक कलाकारांच्या येण्याने- जाण्याने मालिकेच्या टीआरपीमध्ये बराच चढ- उतार सर्वांना दिसून आला. मालिकेतील सर्वच कलाकारांची विनोद करण्याची शैली फारच वेगळी आहे. त्यांच्या या खास शैलीने मालिकेचा चाहता वर्ग बराच मोठा आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Birthday: अशी होते 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ची शूटिंग...

मालिकेत दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली आहे. तिचा चाहतावर्ग भारतभर आहे. २००८ पासून सुरु झालेला हा कार्यक्रम आजही कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. दिशाने मालिकेमध्ये जेठालालच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांना तिला या मालिकेत पाहण्याची इतकी सवय झाली आहे की, अद्याप अजूनही तिला रिप्लेसमेंट मिळालेली नाही. दरम्यान आपण तिच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta: 'या' उत्कृष्ट लेखणीने 'तारकभाई'ना दिली वेगळी ओळख, शेवटच्या श्वासापर्यंत घेतला होता मनोरंजनाचा वसा...

दिशाचा जन्म १७ ऑगस्ट १९७८ रोजी अहमदाबादमधील जन्म झाला आहे. तिचे शिक्षण अहमदाबाद येथेच पूर्ण झाले आहे. दिशा वाकानीने अहमदाबाद येथील गुजरात कॉलेजमधून ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. दिशाचे २४ नोव्हेंबर रोजी चार्टड अकाऊंटंट असलेल्या मयूर पाडियासोबत लग्नगाठ बांधली असून तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Tunisha Sharma: टुनिशा शर्माच्या अंत्य संस्काराला उशीर का होतोय? काय आहे नेमकं कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, दिशाने पतीच्या प्रकृतीमुळे टेलिव्हिजनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दिशाला दिवसातून फक्त ४ तास आणि महिन्यातून १५ दिवसच शूटिंग मिळावं अशी तिची इच्छा होती. मात्र निर्मात्यांना ही अट मान्य नव्हती.

दिशाची एकीकडे चाहते कार्यक्रमात परतण्याची वाट पाहत आहे तर, दुसरीकडे तिला घशाच्या कॅन्सर झाल्याची बातमी व्हायरल होत होती. मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशींनी ही केवळ अफवा असल्याचे म्हटले. दयाबेन आपल्या आवाजासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. दिशाचे वडील भीम वकानी हे गुजराती नाटकात कलाकार आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Anushka Sharma: 'चकदा एक्सप्रेस'चे रॅप अप, अनुष्काने शेअर केले सेटवरील खास फोटो

दिशा वाकानीचा भाऊ मयूर वकानी हा एक उत्तम अभिनेता आहे. मालिकेमध्ये तो दयाबेनचा भाऊ सुंदरलालची भूमिका करत आहे. प्रेक्षकही त्याच्या व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम करतात. अनेक गुजराती नाटकांशिवाय दिशा बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com