Bhaurao Karhade Interview: 'जे झालं चुकीचं होतं...'; मराठी प्रेक्षकां'बाबत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी केलं मोठं वक्तव्य

सध्या अनेक मराठी प्रेक्षक कमालीचे संतापले असून सध्या सोशल मीडियावरून ‘टीडीएम’ चित्रपटाला बराच सपोर्ट मिळत आहे.
Bhaurao Karhade Talk About Marathi Audience
Bhaurao Karhade Talk About Marathi AudienceSaam Tv

Bhaurao Karhade Interview: ख्वाडा आणि बबन या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाचा दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘टीडीएम’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटासाठी स्पेशल प्राईम टाईम मिळत नसल्याने त्यांना चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं लागलं. सध्या अनेक मराठी प्रेक्षक कमालीचे संतापले असून सध्या सोशल मीडियावरून ‘टीडीएम’ चित्रपटाला बराच सपोर्ट मिळत आहे. नुकतेच ‘टीडीएम’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी ‘सकाळ unplugged’ या पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी मराठी प्रेक्षकांसाठी विशेष विधान केलंय.

Bhaurao Karhade Talk About Marathi Audience
Jennifer Mistry Post: मिसेस सोढीने निर्मात्यांना चारित्र्यावरून सुनावलं बरंच काही, स्टोरी शेअर करत म्हणाली...

यावेळी ई-सकाळने घेतलेल्या या मुलाखतीत दिग्दर्शकांचं लाडक्या प्रेक्षकांसाठी काय विशेष मत आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद कसा मिळाला यावर भाऊरावांना प्रश्न विचारले गेले. चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे म्हणतात, “जे झालं ते चुकीचचं होतं आणि सध्या जे काही होतं आहे तेही चुकीचं आहे. प्रेक्षक याबाबत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. सगळ्याच प्रेक्षकांना त्या गोष्टी जाणवल्या आहेत. अनेक जाणकार मंडळी देखील या प्रकरणावर भाष्य करत आहेत. इतकं मोठं प्रकरण होण्याचं काहीच कारण नव्हतं. यावेळी फक्त दोनच चित्रपट होते. त्यामुळे जे झाले ते चुकीचं होतं, असं मला वाटतं. ”

दिग्दर्शक आपल्या मराठी मायबाप प्रेक्षकांविषयी भाष्य करताना म्हणाले, “आपला मराठी प्रेक्षकवर्ग खूपच संवेदनशील आहे. माझ्या चित्रपटाचा विषय जेव्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. तेव्हा, त्याला गावागावातून प्रतिसाद चांगला मिळाला. चित्रपट बंद करण्याचा निर्णय जेव्हा मी घेतला त्यावेळी खेडे-गावातील अनेक प्रेक्षक रस्त्यावर उतरले. खास मराठी चित्रपटासाठी प्रेक्षकवर्ग रस्त्यावर उतरण्याची ही मराठी चित्रपट विश्वातील पहिलीच घटना असेल. हे मला आवर्जुन सांगावंस वाटतं. लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्या ते डोक्यावर घेतात.”

Bhaurao Karhade Talk About Marathi Audience
Mother's Day Special: सुष्मिता सेन ते करिश्मा कपूर, 'या' बॉलिवूड अभिनेत्री आहेत सिंगल मदर

तर पुढे दिग्दर्शक म्हणतात, “मराठी प्रेक्षक फारच सजग आहे. त्यांना जर चित्रपटातील काही आशय- विषय जर आवडला नाही, तर ते थेट सांगतात. माझ्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप सहकार्य मिळाले. अनेकजण ट्रॅक्टर काढून मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मराठी चित्रपट तेव्हाच मोठा होईल जेव्हा...सगळे मिळून एकमेकांना सहकार्य करतील आणि आज तेच करण्याची गरज आहे.”

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com