
TDM Film New Release Date: भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ ची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नाही, मराठी चित्रपटांची गळचेपी होते म्हणत हा चित्रपट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी चित्रपटावर झालेल्या अन्यायावर उठवलेल्या आवाजामुळे थेट प्रेक्षकांनीच चित्रपटाला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला होता.
अन्याया विरूद्ध उठवलेल्या आवाजाला अखेर फळ मिळाले असून या चित्रपटाची एक गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. ‘टीडीएम’ हा चित्रपट पुर्नप्रदर्शित होणार असून येत्या ९ जून २०२३ रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंच्या ‘टीडीएम’ चित्रपटातून भाऊरावांनी दोन नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी दिली. शिवाय चित्रपटाचा विषय वेगळ्या धाटणीचा असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. मात्र चित्रपटाला प्राईम टाईम नसल्यानं, बऱ्याच ठिकाणी शो नसल्यानं हा चित्रपट थिएटरमधूनच काढण्यात आला होता, मात्र आता या चित्रपटाचे निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचं ठरवलं आहे. (Latest Entertainment News)
चित्रपटाविषयी भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, “मी सर्वप्रथम जनतेचे, प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे आभार मानतो. खूप मोठी घटना होती ही, यामध्ये सर्व जनता, प्रेक्षक आणि मित्रपरिवार पाठीशी उभे राहिले त्यामुळे नवी उमेद मिळाली, आणि म्हणून ‘टीडीएम’ येत्या ९ जूनला प्रदर्शित होतोय. एक कलाकार म्हणून जेव्हा एवढा सपोर्ट मिळतो त्यामुळे बळ वाढलंय. बऱ्याच दिग्गज मंडळींनी ही फोन करून खंबीर साथ दिली, बळ दिल. तसेच सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांनी ही स्वतः फोन करून खंबीर साथ दिली, पाठिंबा दर्शविला, खचून न जाता उभं राहण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या या प्रेमाच्या शब्दापोटी मी आज उभा आहे. मी मायबाप प्रेक्षक आणि सर्वांचाच आभारी आहे.” (Marathi Film)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.