Teen Adkun Sitaram Trailer: प्राजक्ता माळीच्या 'तीन अडकून सीताराम'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली

Teen Adkun Sitaram Movie News: 'दुनिया गेली तेल लावत', अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Teen Adkun Sitaram Trailer
Teen Adkun Sitaram TrailerSaam tv

Prajakta Mali New Movie:

मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Actress Prajakta Mali) आगामी 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram Movie) या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अशामध्ये या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना चित्रपट कधी रिलीज (Teen Adkun Sitaram Trailer Released) होणार याची उत्सुकता लागली आहे. 'दुनिया गेली तेल लावत', अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Teen Adkun Sitaram Trailer
Chhota Bheem Teaser: छोटा भीम रुपेरी पडद्यावर, अमुपम खेर यांच्यासह सिनेमात झळकणार अनेक सेलिब्रिटी

'तीन अडकून सीताराम' या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीसोबत अभिनेता वैभव तत्ववादी, हृषिकेश जोशी, आलोक राजवाडे आणि संकर्षण कर्‍हाडेनं हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट बुधवारी पार पडला. या ट्रेलरमध्ये दिसलत आहे की, वैभव, आलोक आणि संकर्षण हे तीन मित्र लंडनमध्ये गेलेले असतात. लंडनमधील पबमध्ये दारुच्या नशेत तिघेही धिंगाणा घालतात. दारुच्या नशेमध्ये तिघेही काहीतरी अशी गोष्ट करतात की ज्यामुळे पोलीस त्यांना अटक करतात. आपण नशेत काय केलं याची त्यांना किंचितही जाणीव नसते.

Teen Adkun Sitaram Trailer
Happy Birthday Ayushmann Khurrana: लग्नात गाणी गाऊन कमावले पैसे, 'या' चित्रपटानं बदललं आयुष्यमानचं आयुष्य; आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

प्राजक्ता माळी ही या चित्रपटामध्ये वैभवची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्याचे कळताच प्राजक्ता तिघांना सोडवण्यासाठी धडपड करते. जेलमध्ये अडकलेल्या या तिघांचे काय होणार? प्राजक्ताला त्यांना जेलमधून बाहेर काढण्यामध्ये यश येईल की नाही? या सर्व गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्येच पाहायला मिळतील.

'तीन अडकून सीताराम' या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादीने पुष्कराजची भूमिका साकारली आहे. तर संकर्षणने अजिंक्यची भूमिका साकारली आहे. तर अलोकने कौटिल्यची भूमिका साकारली आहे. याचसोबत या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीसोबत गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील हे सर्व कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे डायलॉग हृषिकेश जोशी यांनीच लिहिले आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Teen Adkun Sitaram Trailer
Parineeti-Raghav Wedding Card: परिणीती आणि राघवच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का?, लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com