Premachi Gosht Serial: 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताच्या आयुष्यात येणार नवा पार्टनर, VIDEO शेअर करत दाखवली झलक

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता हे पात्र साकारत आहे.
Premachi Gosht Tejashri Pra
Premachi Gosht Tejashri PraSaam TV

Tejashri Pradhan Share Video:

अभिनेत्री तेजश्री प्रधान 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तेजश्री प्रधानची जान्हवी ही ओळख प्रेक्षकांच्या मनात अद्याप ताजी आहे. २०१६ साली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तेजश्रीची नवीन मालिका नुकतीच प्रदर्शित झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेचे नाव आहे 'प्रेमाची गोष्ट'.

तेजश्री प्रधान 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता हे पात्र साकारत आहे. अभिनेत्री नुकताच तिचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ताने एका स्पेशल पात्राची ओळख करून दिली आहे.

Premachi Gosht Tejashri Pra
Tharala Tar Mag Serial: मेकअपची कमाल की खरीखुरी घटना; शिल्पा नवलकरचा व्हिडीओ पाहून प्रेक्षक बुचकळ्यात

तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. बोक्यासोबत तेजश्रीचे क्युट क्युट फोटो वापरून हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हॅलो हुमन्स... माझं नाव बोक्या (ही खूप फॅनी स्टोरी आहे.. माझी गोष्ट तुम्हाला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल.) मी फक्त तुमच्यामध्ये फिट होण्याच्या प्रयत्न करत आहे. तुम्ही सांगा हे तुमचं आवडत पात्र आहे ना.'

तेजश्री प्रधान म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ताने एका क्युट पपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधला हा बोक्या मालिकेत दिसणार आहे. तसेच मुक्ताच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग असणार आहे. (Latest Entertainment News)

तेजश्रीच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटी देखील कमेंट करत आहेत. निवेदिता सराफ या 'अगंबाई सासूबाई' या मालिकेत तेजश्रीच्या सासू भुमिका केली होती. त्यांनी कमेंट करत लिहिले आहे, 'सनी तुझ्यावर खूप रागावला आहे.'

'प्रेमाची गोष्ट' ही मालिका ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेचा टीआरपी हाय आहे. परंतु ही मालिका 'ये हैं मोहब्बते' या हिंदी मालिकाच रिमेक असल्याचे म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com