
मुंबई: टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash)नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. बिग बॉसच्या विजयानंतर अभिनेत्री चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. तेजस्वी नवनवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तेजस्वी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच तिने मनोरंजनसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर (Social Media)तेजस्वी तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच तेजस्वीने एक आलिशान कार खरेदी केली आहे. आतादेखील नवीन माहिती समोर आली आहे. नुकतेच तेजस्वीने गोव्यात घर खरेदी केले आहे.
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश सध्या यशाच्या शिखरावर आहे. माहितीनुसार, तेजस्वीने गोव्यात एक नवीन घर घेतले आहे. तेजस्वीच्या बॉयफ्रेडने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. नेहमीप्रमाणेच करण कुंद्रा खूप आंनदी दिसत आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तेजस्वीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
करण कुंद्राने तेजस्वीचा नवीन घराची चावी घेतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ति खूप आंनदी दिसते आहे. व्हिडिओ शेअर करत, करणने "अभिनंदन!! तू तुझ्या या श्रेयासाठी पात्र आहेस! मला तुझा खूप अभिमान आहे, तू खूप मेहनती आहेस." असे म्हटलं आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते अभिनंदन करत आहेत.माहितीनुसार, यापूर्वी ५ एप्रिल २०२२ रोजी तेजस्वीने आलिशान कार खरेदी केली आहे. यावेळी बॉयफ्रेड करण कुंद्राही तिचे अभिनंदन केले होते.
Edited By- Manasvi Choudhary
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.