
मालिका कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असतो. मालिकेचे कथानक, मालिकेमध्ये सुरु असलेला ट्वीस्ट कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. गेल्या अनेक दिवसांपासून कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणारी ‘रमा राघव’ ही मालिका चर्चेत आहे. नुकताच मालिकेमध्ये एक नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘रमा राघव’ मालिकेमधून अभिनेत्री अर्चना निपाणकर हिने एक्झिट घेतली आहे. मालिकेमध्ये अर्चनाने राघवच्या वहिनीचे म्हणजेच पूजा नावाचे पात्र साकारले आहे. (Serial)
अर्चानाने नुकताच मालिकेतून निरोप घेतला असून नुकतंच तिने व्हिडीओ शेअर करत मालिका सोडण्यामागील खरं कारण सांगितलं आहे. अर्चना निपाणकरनंतर मालिकेमध्ये पूजा नावाचे पात्र अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अर्चना म्हणते, “नमस्कार मी अर्चना निपाणकर, आतापर्यंत तुम्ही मला ‘रमा राघव’ मालिकेत पूजाची भूमिका साकारताना पाहत होता. तुम्ही सगळ्यांनीच मी साकारलेल्या या भूमिकेवर प्रेम केलंत. माझ्या कामाच खूप खूप कौतुक केलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पण दुर्दैवाने माझ्या काही पर्सनल कारणांमुळे मला ही मालिका सोडावी लागतेय. अर्थात या सगळ्यात कलर्स मराठीची टीम, माझं प्रोडक्शन क्रिएटीव्ह ट्रान्समीडिया आणि माझ्या मालिकेची संपूर्ण टीम या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी मला खूप मदत केल्यामुळे अर्थात हे सगळं शक्य झालंय.” (Actress)
अभिनेत्री आपल्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणते, “पण आनंदाची बातमी अशी आहे की, पूजाची भूमिका आता अत्यंत गुणी आणि छान अभिनेत्री श्वेता अंबिकर साकारणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, जसं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, पूजावर प्रेम केलं, तसंच तुम्ही नवीन पूजावर म्हणजे श्वेता अंबिकरवर सुद्धा प्रेम कराल आणि तिला आपलंस करून घ्याल, असा माझा विश्वास आहे. आतापर्यंत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल, माझं जे इतके दिवस तुम्ही कौतुक केलं त्या सगळ्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. Thank You So Much...” (Marathi News)
अभिनेत्रीच्या एक्झिटमुळे चाहते खूप नाराज आहेत. अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहते म्हणतात, “नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा...” तर आणखी एक युजर म्हणतो, “अरे बापरे अर्चना मॅम मी तर फक्त तुमच्यासाठी ही मालिका बघायचो. लवकरच नवीन मालिकेत अथवा चित्रपटामध्ये वाट बघू.” तर आणखी एक तिचा चाहता म्हणतो, “बिग बॉस मराठी सुरू होतंय ना… तू आहेस का?” तर आणखी एक युजर म्हणतो, “पूजा तू मालिका का सोडली? तुझी खूप आठवण येईल. तुझा अभिनय खूप छान होता.” (Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.