
TMKOC Actress Jennifer Mistry Bansiwal: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेनिफर मेस्त्री बंसीवालनं काल मालिकेच्या निर्मात्यांसह, प्रोजेक्ट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरने लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. आता या प्रकरणावर मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर नुकतंच मिसेस रोशन सिंग सोढी उर्फ जेनिफर मेस्त्री बंसीवालनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत, लवकरच जगासमोर सत्य येईल असं म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.
जेनिफर मेस्त्रीने एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. मालिका सोडल्याचं सांगत अभिनेत्रीनं सांगितलं की, अनेक गोष्टींना सहन करत आली असून त्याकडे दुर्लक्ष केलं कारण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं होतं. जेनिफरने लावलेल्या आरोप चुकीचे ठरवत मालिकेचे प्रोजेक्ट म्हणतात, जेनिफर तिला मालिकेत परत घेण्यासाठी आम्हाला ब्लॅकमेल करत होती.
तारक मेहताच्या निर्मात्यांवर जेनिफरने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर, नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या पोस्टमध्ये आपल्या आरोपांना खोटं ठरवणाऱ्यांना कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मिसेस रोशन सिंग सोढी फेम जेनिफर मेस्त्री म्हणते, “मी शांत बसली म्हणजे, याला माझी कमजोरी समजू नका, मी गप्प होते, कारण मला उगाचच माझ्या कामाची प्रतारणा करायची नव्हती. देव सगळं पाहतोय, त्याला माहितीय खरं काय आहे ते, त्याच्या दरबारात तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही.”
जेनिफरने तिच्या ऑफिशियल अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शन दिले की, “सत्य लवकरच समोर येईल.न्याय मिळेल.” तिची ही पोस्ट पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या या पोस्टला समर्थन करत युजर्स म्हणतात, ‘तु फक्त लढ, आम्ही तुझ्यासोबत आहोत.’ तर आणखी युजर म्हणतो, ‘न्यायासाठी लढ..मागे हटू नकोस.’
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम जेनिफर मेस्त्री बंसीवाल हिने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाला खोटं ठरवत प्रोजेक्ट हेड सोहेल रमानीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने जेनिफर सोबतचा करार रद्द केला होता, तीन महिने आधीच तिला मालिकेतून बाहेर काढण्यात आला होता. तिला कुठेच काम मिळत नसल्याने मालिकेत परत यायचं होतं.. म्हणून ती असं सगळं करतेय.. हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे.”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.