
‘साथ निभाना साथियाँ’ मालिकेमधील ‘गोपी बहू’च्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने स्वत:ची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. मालिका संपल्यानंतर सुद्धा देवोलिना भट्टाचार्जी कायमच सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच गेल्या मे महिन्यामध्ये देवोलिनाने जीम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली.
अभिनेत्रीला लग्नानंतर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, तिच्या रिल लाईफमुळे ती चर्चेत आली आहे. लवकरच अभिनेत्री एका नव्या टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून टेलिव्हिजनसृष्टीपासून दूर राहणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच येत्या काही दिवसांत देवोलिना एका नवीन टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून टेलिव्हिजनसृष्टीत डेब्यू करणार आहे. ‘दिल दियां गल्लां’ या टीव्ही शोमध्ये दिशा नावाचे नवीन पात्र अभिनेत्री साकारणार आहे. ते पात्र अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी साकारणार आहे. शोमध्ये सध्या १० वर्षांच्या लीपची घोषणा झाल्यामुळे सध्या मालिकेत अनेक नवीन चेहऱ्यांची एन्ट्री झालेली आहे. ती या मालिकेमध्ये एका म्यूझिक शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे.
मालिकेमध्ये ती एका घटस्फोटित आईची भूमिका साकारत असून जिचा भुतकाळ खूपच त्रासदायक आहे. शोमध्ये अभिनेत्रीचे मुख्य पात्र वीरसोबत असणार आहे. वीरचे आयुष्य त्याची पत्नी अमृताच्या दुःखद निधनामुळे खूप बदलले आहे. मालिकेमध्ये दिशा नावाच्या पात्राची एन्ट्री झाल्यामुळे प्रेक्षकांना शोमध्ये मनोरंजक ट्विस्ट पाहायला मिळेल हे नक्की. देवोलिना भट्टाचार्जी ही या शोचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. नुकतंच सोनी सबच्या इंस्टाग्राम पेजवर देखील तिच्या एन्ट्रीचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीची एन्ट्री होत असल्यामुळे प्रेक्षकही मालिकेत तिला पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
नुकतंच देवोलिनाने तिच्या भूमिकेबद्दल एका वेबसाईटला मुलाखत दिली आहे. व्यक्तिरेखेबद्दल सांगितले की, मी या शोचा एक हिस्सा झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. मी साकारलेल्या या भूमिकेमुळे कथेमध्ये खूपच ट्वीस्ट अनुभवता येणार आहे. ‘दिल दियां गल्लां’ या मालिकेविषयी सांगायचे तर, मालिका अमृता, वीर आणि त्यांची मुलगी आलिया या तिघांभोवती कथा फिरताना दिसते. मुलगी आलियाच्या जन्मानंतर अमृताचा (आलियाच्या आईचा) मृत्यू झालेला असतो. यामुळे वीर (आलियाचे वडील) आपल्या मुलीपासून दूर झालेला असतो.
तर एकीकडे आलिया आणि तिचे वडील वीर आणि दुसऱ्या बाजुला दिशाची कथेमध्ये एन्ट्री होते. आता मालिकेमध्ये दिशाच्या एन्ट्रीने आलिया आणि वीर यांच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अभिनेत्री देवोलीनाबद्दल बोलायचे झाले तर, लग्नानंतर ‘दिल दियां गल्लां’ या टीव्ही शोच्या माध्यमातून देवोलीना टेलिव्हिजन स्क्रिनवर परत येणार असल्याने चाहते आनंदित झालेय. ती याआधी साथ निभाना साथिया, दिया और बाती हम यांसारख्या काही टेलिव्हिजन शोमध्ये दिसली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.