किंग खानच्या 'जवान' मध्ये थलपतीची होणार एन्ट्री? एटलीच्या सोशल मीडिया पोस्टने वेधलं लक्ष

एटली कुमारने इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.
Jawan Movie News
Jawan Movie NewsInstagram @thalapathy_vijay_official_

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान(Sharukh Khan) त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडचा बादशाह रूपेरी पडद्यावर परतणार आहे. तमिळ चित्रपट दिग्दर्शक अरुण कुमार म्हणजेच एटली शाहरूखच्या जवान चित्रपटात खास शैलीत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच दिग्दर्शक एटलीचा वाढदिवस साजरा झाला आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त साऊथ सुपरस्टार थलपती विजय आणि बॉलिवूड बादशाह शाहरुख खान उपस्थित होते. यामुळेच एटली चित्रपटात असल्याच्या अटकळ्या सोशल मीडियावर(Social Media) लावल्या जात आहेत.

Jawan Movie News
The Journey Of India: बिग बी 'या' कार्यक्रमातून घेणार देशाचा गेल्या ७५ वर्षांचा आढावा !

एटली कुमारने इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये एटली कुमार मध्यभागी उभा आहे तर एका बाजूला थलपती विजय आणि दुसऱ्या बाजूला शाहरुख खान दिसतो आहे. तिघेही ब्लॅक आउटफिटमध्ये आहेत. या फोटोसोबत एटलीने "माझ्या वाढदिवशी मी यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू शकतो. माझा आतापर्यंतचा सर्वात उत्तम वाढदिवस आणि तो पण माझ्या साथीदारासह."असा कॅप्शन दिला आहे. एटलीने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटात थलपती विजय देखील दिसणार का, असा प्रश्न चाहत्यांना आहे. परंतु एटली कुमारने याविषयी कोणतीही स्पष्टता दिलेली नाही.

गौरी खान निर्मित 'जवान' चित्रपट २ जून २०२३ रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री नयनताराही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासह साऊथ स्टार विजय सेतुपतीही असणार आहे.

Jawan Movie News
Richa-Ali Wedding: चाहत्यांकडून मिळतोय प्रेमाचा वर्षाव, रिचा-अलीच्या लग्नाची ही अनोखी पत्रिका व सजावट

माहितीनुसार, एटली कुमार प्रामुख्याने तमिळ चित्रपट दिग्दर्शक आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'राजा-रानी' या डेब्यू तमिळ चित्रपटामुळे एटली यांनी लोकप्रियता मिळाली आहे. अॅटली यांनी या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली.

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com