
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी (Actress Jui Gadkari) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जुईच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर तिने स्वत:च लग्नाची तारीख सांगितली आहे. जुई गडकरी पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. जुईने मंगळागौरीचं शुटिंग सुरु असताना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे. जुईने लग्नाची तारीख जरी सांगितली असली तरी तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आणि त्याच्याबद्दल काहीच सांगितले नाही. त्यामुळे तो नेमका आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी जुईचे चाहते खूपच उत्सुक आहेत.
जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mang) या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सायलीची भूमिका साकारत असून ती सर्वांना प्रचंड आवडत आहे. 'बिग बॉस'नंतर जुई गडकरीने आजारपणामुळे ब्रेक घेतला होता. पण तिने 'ठरलं तर मग' या मालिकेतून पुनरागमन केलं. या मालिकेच्या माध्यमातून ती पुन्हा घराघरामध्ये पोहचली आहे. नुकताच या मालिकेत मंगळागौरीचं शूटिंग दाखवण्यात आलं. यावेळी जुई गडकरी आणि तिचा सहकलाकार अमित भानुशाली यांनी 'हंच मीडिया'ला मुलाखत दिली. याचवेळी जुईने तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये लग्न कधी करणार याची तारीख जाहीर केली.
मुलाखतीमध्ये जुई आणि अमितला अनेक प्रश्न विचारण्यात आले. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल चांगलेच माहित आहे. अशामध्ये अमितला जुईच्या लग्नाची तारीख काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमितने २४ फेब्रुवारी २०२४ अशी तारीख सांगितली. अमितच्या उत्तरावर जईने सुधारणा करत सांगितले की, 'अमित थोडासा चुकलाय कारण लग्नाची तारीख ४ आहे. महिना फेब्रुवारीच असेल. यंदा मला व्हॅलेंटाईन डे जरा चांगला साजरा करायचा आहे.', असं जुईने सांगितले. त्यामुळे सर्वांना जुईच्या लग्नाची तारीख तर काळालीच.
या मुलाखतीमध्ये जुईने पुढे असे देखील सांगितले की, 'मी माझ्या जोडीदाराला सगळ्यात मौल्यवान गोष्ट गिफ्ट म्हणून देणार आहे. माझा वेळ आणि माझं संपूर्ण आयुष्य.' असं जुईने सांगितलं. जुईच्या लग्नाची तारीख ऐकल्यानंतर आता तिच्या चाहत्यांना तिचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे. कारण जुईने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.
दरम्यान, जुई गडकरीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने आपल्या करिअरमध्ये ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे…’ या मालिकांमध्ये काम केले. पण जुईच्या आयुष्याला खरी कलाटणी 'पुढचं पाऊल' या मालिकेमधून मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी घराघरामध्ये पोहचली. आता सध्या ती 'ठरलं तर मगं' या मालिकेमध्ये सर्वांचे मनोरंजन करत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.