
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय गेम शो 'कौन बनेगा करोडपती'(kaun Banega Crorepati) हा सर्व प्रेक्षकांचा आवडता शो आहे. दीर्घकाळ चालणारा हा शो आजही प्रत्येक घरात तितक्याच उत्सुकतेने पाहिला जातो. या शोला प्रेक्षकांनी एवढी पसंती दर्शवली की लवकरच 'कौन बनेगा करोडपती'या शोचा १४ वा सीझन प्रदर्शित होणार आहे. याशोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होतात आणि आपल्या बुध्दिमत्तेच्या कौशल्यावर विजेतेही होत असतात. अलीकडेच, शोचा नवीन प्रोमो रिलीज करून निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. प्रोमोमध्ये आमिर खान पहिल्या एपिसोडमध्ये सहभागी होताना दिसतो आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये आमिर खान आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन दोघेही हसताना दिसत आहेत.
सोनी वाहिनीने 'कौन बनेगा करोडपती'चा नवीन प्रोमोचा व्हिडीओ इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना 'आमिर खानचे प्रेमच आमच्यासाठी प्रमोशन आहे', असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडीओमध्ये आमिर खान आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन दोघेही विनोद करताना दिसत आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अमीर खानला केबीसीचा होस्ट न झाल्यामुळे टोलाही लगावला आहे.
'कौन बनेगा करोडपती' शोच्या प्रोमो व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन आणि आमिर खान एकत्र दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आमिर खान त्याच्या शेजारी बसलेल्या स्पर्धकाला सांगतो की, 'मी ट्विटरवर आलो याबद्दल अमितजींचे आभार. पण, माझ्याकडून काही ट्वीट होत नाही, कळत नाही काय प्रतिक्रिया द्यायची आहे,'' हे बोलून आमिर हसायला लागतो.
अमिर खान पुढे अमिताभ बच्चन यांना सांगतो की, सर माझे काही मित्र आहेत, ज्यांचे चित्रपट रिलीज होत असतात तेव्हा मी त्यांच्या चित्रपटाचे ट्विटरवर प्रमोशन करतो. दरम्यान लगेचच अमिताभ बच्चन यांनी विचारले, 'तुम्ही अनेक चित्रपटाचे प्रमोशन करता, पण मग आपल्या केबीसीचं प्रमोशन का केलं नाही?' अमिताभ बच्चन यांच्या या प्रश्नावर आमिर खान मान खाली करत त्यांना उत्तर देतो, केबीसीला प्रमोशनची गरज कुठे आहे? आमिरने लगेचच दिलेल्या या प्रतिक्रियेवर अमिताभ बच्चन टाळ्या वाजवून हसायला लागतात.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुप्रतिक्षित शो 'कौन बनेगा करोडपती'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 'कौन बनेगा करोडपती' हा शो ७ ऑगस्टपासून सोनी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. १४व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर आमिर खान दिसणार आहे. या दोघांची विनोद शैली पाहण्यासाठी प्रेक्षकांना आतुर झाले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.