Bigg Boss Marathi season 4 : बिग बॉस मराठीच्या घराचे दरवाजे लवकरच उघडणार!

प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीया शोला भरभरून प्रेम दिले आणि आता प्रेक्षक या शोच्या ४ सीझनची वाट पाहत आहेत.
Bigg Boss Marathi will start soon
Bigg Boss Marathi will start soonSaam Tv

मुंबई : टीव्हीवर अनेक मराठी मालिका, रीयलिटी शो पाहणारा प्रेक्षक वर्ग काही कमी नाही. मराठीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात. मधल्या काळात असाच एक रियलिटी शो खूप प्रसिद्ध झाला होता. ज्याच्या शोच्या चर्चा प्रत्येक घराघरात होत होत्या. हा प्रसिद्ध शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'(Big Boss Marathi). या शोची सुरुवात २०१८ साली झाली आणि आता बिग बॉस मराठीचे ३ सीझन पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीया शोला भरभरून प्रेम दिले आणि आता प्रेक्षक या शोच्या ४ सीझनची वाट पाहत आहेत. या सर्व बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बिग बॉस मराठीचा ४ सीझन लवकरच सुरू होणार असून निर्मात्यांनी आगामी सीझनचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे.

Bigg Boss Marathi will start soon
कतरिना कैफला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; विकीची पोलिसांत धाव

बिग बॉस मराठी या शोचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करत, मराठी मनोरंजनाचा बिग बॉस येतोय, लवकरच... आपल्या कलर्स मराठीवर, असे या पोस्टच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे. या शोची घोषणा होताच प्रेक्षकांसोबत मराठी कलाकारही ४ सीझनसाठी खूप उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीचा जुना स्पर्धक पुष्कर जोगने(Pushkar Jog) आधीच आपला उत्साह दाखवला कमेंटकरून आपला आनंद व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi will start soon
मिका सिंगने निवडली नवरीबाई; कोण आहे आकांक्षा पुरी?

टीझरमध्ये सीझनच्या प्रक्षेपणाची तारीख सांगण्यात आली नाही. परंतु महितीनुसार, बिग बॉस मराठी २०२२च्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रसारित होण्याची शक्यता आहे. शोचा मागील सीझन ३ सप्टेंबर २०२१ मध्ये प्रसारित झाला होता आणि २६ डिसेंबर २०२१ रोजी संपला होता.

या शोचे प्री-प्रॉडक्शन काम सुरू झाले आहे. परंतु माहितीनुसार, शोच्या स्पर्धकांची नाव अजूनही गुलदस्त्यात आहेत. त्याचबरोबर या शोचे होस्ट महेश मांजरेकर चौथ्या सीझनसाठी होस्ट म्हणून परत येणार की नाही हे देखील अद्याप निश्चित झालेले नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com