क्रुरतेचा कळस! रजनीकांतच्या फिल्मच्या पोस्टरवर चाहत्यांनी चक्क शिंपडले बकरीचे रक्त!

रजनीकांतच्या आगामी फिल्मच्या पोस्टरचा अभिषेक दुधाने नाही तर चक्क बकरीच्या रक्ताने केला गेला आहे. होय हे खरं आहे!
क्रुरतेचा कळस! रजनीकांतच्या फिल्मच्या पोस्टरवर चाहत्यांनी चक्क शिंपडले बकरीचे रक्त!
क्रुरतेचा कळस! रजनीकांतच्या फिल्मच्या पोस्टरवर चाहत्यांनी चक्क शिंपडले बकरीचे रक्त!Saam Tv News

चेन्नई: सुपरस्टार रजनीकांतचे चित्रपट कुणाला नाही आवडत? त्यांच्या चित्रपटाची नुसती घोषणा झाली तरी त्यांचे चाहते अक्षरशः धिंगाणा घालतात. रजनीकांतच्या सिनेमाच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक घालणे ही तर आता सामान्य बाब झाली आहे. मात्र रजनीकांतच्या काही अतिउत्साही चाहत्यांनी रजनीकांतबद्दलचं प्रेम दाखवण्यासाठी भयंकर क्रुर मार्गाचा अवलंब केला आहे. यावेळी रजनीकांतच्या आगामी फिल्मच्या पोस्टरचा अभिषेक दुधाने नाही तर चक्क बकरीच्या रक्ताने केला गेला आहे. होय हे खरं आहे! (The culmination of cruelty! Fans sprinkled goat's blood on Rajinikanth's movie poster!)

हे देखील पहा -

रजनीकांतची आगामी फिल्म 'अन्नाथे'च्या (Annaatthe) पोस्टरचा फर्स्ट लुक लॉन्च करण्यात आला. यावेळी चेन्नईमधील त्यांच्या चाहत्यांनी आनंद साजरा करण्यासाठी भयंकर क्रुर कृत्य केले. या चाहत्यांनी प्रथम रजनीकांतच्या पोस्टरला हार घातला. मग तिकडे एका जिवंत बकरीला फरफटत आणण्यात आलं. नंतर एकाने बकरीच्या गळ्याला रश्शीने घट्ट पकडले तर दुसऱ्याने रजनीकांतच्या नावाचा जयघोष करत तलवारीच्या सहाय्याने एका फटक्यात बकरीचे मुंडके उडवले. इतकंच नाही तर बकरी तडफडायला लागल्यानंतर एकाने तिला उचलून त्या बकरीचे रक्त पोस्टरवर शिंपडले आणि मग बकरीला खाली टाकून दिले. यावेळी चाहत्यांनी रजनीकांत नावाचा जयघोष केला आणि काही क्षणांतच बकरीने प्राण सोडले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल (Viral Video) होत असून या क्रुर कृत्याची सर्वच स्तरातून निंदा केली जातेय. याबाबत अखिल भारतीय रजनीकांत रसिकर मंदरमचे प्रशासक आणि रजनीकांत यांच्या जवळचे मानले जाणारे वी एम सुधाकर यांनी या घटनेची कठोर निंदा करत दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ''हे कृत्य घोर निंदणीय आणि दुःखदायक आहे, कुणीही अशा हिंसक कृत्यात सामील होऊ नये.''

क्रुरतेचा कळस! रजनीकांतच्या फिल्मच्या पोस्टरवर चाहत्यांनी चक्क शिंपडले बकरीचे रक्त!
मुंबईत कोरोनाच्या सावटाखाली पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गौराईला निरोप

रजनीकांतचा अन्नाथे हा चित्रपट दिवाळीत म्हणजे ४ नोव्हेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे. या फिल्मचे दिग्दर्शन आणि लेखन सिवा यांनी केले असून कलानिथी मारन हे या चित्रपटातचे लेखक आहेत. या फिल्ममध्ये मीना, खुशबू, जगपति बाबू, प्रकाश राज यांसारखे स्टार्स लीड रोल मध्ये असणार आहेत. तर चित्रपटाचं संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते विनर डी इमान यांनी तयार केलं आहे. विशेष म्हणजे दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम ने यांनी निधनापुर्वी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com