
Indian Documentary Won Oscars 2023: आज ऑस्कर म्हणजे ९५ अकादमी पुरस्कार सोहळा पार पडत आहे. यंदाचे वर्ष भारतासाठी महत्त्वाचे आहे. कारण यावर्षी भारताला ३ नामांकने मिळाली आहेत. तर पहिल्या ऑस्कर पुरस्कारावर कोरले गेले आहे. सर्वोत्कृष्ट लघुपट या श्रेणीत भारताला पहिला पुरस्कार मिळाला आहे.
कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचा नेटफ्लिक्स लघुपट, 'द एलिफंट व्हिस्परर्स' या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट श्रेणीत ऑस्कर जिंकला आहे. हौलआउ, How Do You Measure a Year?,द मार्था मिशेल इफेक्ट आणि स्ट्रेंजर अॅट द गेट या लघुपटांशी स्पर्धा करत होता.
दिग्दर्शक गोन्झाल्व्हस यांनी हा पुरस्कार मातृभूमी भारतला समर्पित केला. गुनीतने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, "आजची रात्र ऐतिहासिक आहे कारण भारतीय निर्मितीसाठी हा पहिलाच ऑस्कर आहे..."
अचिन जैन आणि गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित, 41 मिनिटांचा हा लघुपट तामिळनाडूच्या मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील कुटुंबावर आधारित आहे. या कुटुंबातील वयस्क जोडपे अनाथ हत्तीला दत्तक घेते. या भारतीय लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट निर्माता गोन्साल्विस यांच्या दिग्दर्शनातील पदार्पण होते.
या वर्षीच्या ऑस्करमध्ये भारताने एकूण तीन ऑस्कर नामांकने मिळवली होती - सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी RRR गाणे “नाटू नाटू”, सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म (शौनक सेनचा ऑल दॅट ब्रेथ्स), आणि सर्वोत्कृष्ट लघुपट कार्तिकी गोन्साल्विस-दिग्दर्शित द एलिफंट व्हिस्परर्स.
'द एलिफंट व्हिस्परर्स' सध्या Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.