Oscars 2023 : 'द काश्मिर फाईल्स'ची ऑस्करमध्ये निवड, सोशल मीडियावरुन दिली 'गुड न्यूज'...

2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
The Kashmir files Movie
The Kashmir files Moviesaam tv

The Kashmir Files Oscar Awards: 2022 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटाची ऑस्कर 2023 साठी निवड करण्यात आली आहे. भारतातून ऑस्करसाठी निवडलेल्या 5 चित्रपटांमध्ये या सिनेमाचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ही गुड न्युज सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

The Kashmir files Movie
Kantara Oscar Award: 'कांतारा'ची यशस्वी घोडदौड, ऑस्करमध्ये मिळली 'ही' दोन महत्त्वाची नामांकने

या यादीत 'द काश्मीर फाइल्स' सह इतर काही हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. विवेक अग्निहोत्रीने 'द काश्मीर फाइल्स' आणि इतर भारतीय चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या चित्रपटाच्या ऑस्कर यादीतील काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्करच्या यादीत नामांकनासाठी विचारात घेतलेल्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत द कश्मीर फाइल्स, कांतारा, आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडीसह काही चित्रपटांचा समावेश आहे.

The Kashmir files Movie
Hrithik Roshan: पहिल्या सिनेमासाठी करोडो नाही तर मिळाले इतके मानधन; रक्कम ऐकून व्हाल अचंबित...

भारताकडून 'छेल्लो शो' या चित्रपटाला अधिकृत एंट्री आहे. सोबतच विवेक अग्निहोत्रीने आणखी एक ट्विट करत सांगितले की, चित्रपटातील कलाकारांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'च्या श्रेणीत नामांकन प्राप्त झाले आहे.

अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांना चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनय श्रेणीसाठी निवडण्यात आले आहे. ही गुड न्युज शेअर करत विवेक म्हणतो, 'ही फक्त सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या सर्व कलाकारांना आपले आशीर्वाद द्या.'

The Kashmir files Movie
Urfi Javed: आता तर हद्दच झाली! उर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचले, म्हणते; 'चित्रा ताई मेरी...'

हा चित्रपट जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा, त्यानंतर विवेकने सर्वांना चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली होती. चित्रपट पाहून लोक भावूक होऊन रडत रडत सिनेमागृह सोडत होते. चित्रपटाने आत्ता पहिला टप्पा पार केला आहे. आता तमाम देशवासीयांना प्रतीक्षा आहे, ती ऑस्करच्या अंतिम नामांकन यादीची. अंतिम नामांकन यादी २३ तारखेला येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com