
‘द केरला स्टोरी’मुळे चर्चेत आलेल्या अदा शर्माची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. सध्या अभिनेत्रीचं मराठी भाषेवरील प्रेम प्रचंडच चर्चेत आलं आहे. तिने अनेकदा चाहत्यांसोबत अस्खलित मराठी भाषा बोलत असतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील मराठीमध्ये भाषण करत असतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला होता. तिचा तो व्हिडीओ सुद्धा प्रचंड चर्चेत आला होता. अशातच आणखी एक अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. त्यात तिने खास नऊवारी साडी परिधान केलेली दिसून येत आहे. तिचा हा मराठमोळा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
अभिनेत्रीने हा लूक दहीहंडीच्या निमित्ताने केला होता. लूकमध्ये अभिनेत्रीने नाकात नथ, कपाळा बिंदी आणि टिकली, गळ्यात नेकलेस आणि पारंपारिक नऊवारी साडी असा लूक परिधान केला आहे. अभिनेत्रीच्या या मराठमोळ्या लूकची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिला दहीहंडीच्या दिवशी आलेला एक अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “कशी वाटली? काष्ट साडी, नथ आणि स्निकर्स?, ही माझ्या आजीची साडी आहे. मी दहीहंडीच्या शोसाठी तयारी झाल्यानंतर मला असिरा म्हणाली नऊवारीसाडीवर स्निकर्स घालूया. माझ्याकडे साडीवर मॅचिंग स्निकर्स नसल्यामुळे मी तान्याचे स्निकर्स चोरले. तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की, साडी नेसून जवळपास १ किलोमीटर मला चिखलातून चालायला लागणार आहे. जर मी सँडल घालून गेली असते. तर कशी व्यवस्था झाली असती?, विचार न केलेलाच बरा. पुढे आमची रील पाहा तुम्हाला सर्व समजेल.”
अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट कमेंटस केल्या आहेत. अभिनेत्रीच्या या मराठमोळ्या लूकवर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. “मराठी मुलगी”, “अदा की अदा”, “मॅडम, तुम्हाला मराठी संस्कृती खूपच आवडते वाटतं”, “भारतीय संस्कृती या चित्रात दिसून येते” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी पोस्टवर केल्या आहेत.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे तर, सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ने एकट्या भारतात २८८. ०४ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात चित्रपटाने ३०३. ९७ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेत्रीने प्रेक्षकांचे मराठीतून पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले होते. सोबतच आषाढी एकादशीला चाहत्यांना विठ्ठलाचे अभंग गात आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.